बनावट शिधापत्रिकांतून धान्याचा अपहार तालुक्यातील नागलवाडी येथील सरंपच अशोक डाडर व उपसरंपच वर्षा कापरे यांच्या नेतृ...
तालुक्यातील नागलवाडी येथील सरंपच अशोक डाडर व उपसरंपच वर्षा कापरे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले. या आंदोलनामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. आंदोलकांच्या वतीने भाजपचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, राष्ट्रवादीचे सुनील शेलार यांनी महसूल अधिकार्यांशी चर्चा करत त्यांना चांगलेच धारेवर धरले होते. निवेदनामध्ये म्हटले आहे की, नागलवाडी येथील सीनापात्रात सन 2005 पासून रोजरोस बेकायदेशीर वाळूउपसा होत आहे. 10 फेबु्रवारी 2015 रोजी सीना नदीत वाळू उपसा केल्याचा पंचनामा झाला आहे. 6 एप्रिल 2015 रोजी वनविभागाच्या हद्दीत अवैध वाळूसाठा पकडून त्याचा पंचनामा झाला आहे.2 जानेवारीलाही पंचनामा झाला आहे. मात्र, पंचनाम्यांनंतर कोणतीही कारवाई झालेली नाही. वाळू उपशामुळे नदीपात्रात पाण्याचा थेंबही राहिलेला नाही. वाळू उपसा बंद करावा, यासाठी तलाठी, मंंडलाधिकारी व तहसील कार्यालयास वारंवार लेखी तक्रारी केल्या. मात्र, कोणतीच कारवाई होत नाही. वाळू उपसा तातडीने बंद करण्यात यावा. तसेच स्वस्त धान्य दुकानदार मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दुकानदार गुन्हेगारी पार्श्वभूमी चा असून, दमदाटी करीत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. महिनाभर धान्य वितरणाची जबाबदारी असताना महिन्यातून दोन दिवस देखील वितरण होत नाही. अनेकांना मागील 5 वर्षांपासून धान्य दिलेले नाही. रॉकेल जादा दराने विकत असून अनेकांना रॉकेल न देता ते काळ्या बाजारात विकले जात आहे. अंत्योदय आणि अन्नसुरक्षा योजनेचे धान्य काळाबाजारात विकले जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आह










