शहर सहकारी बॅंकेचे संस्थापक संचालकप्रा. घैसास काळाच्या पडद्याआडअहमदनगर शहर सहकारी बॅंकेचे संस्थापक संचालक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेत...
शहर सहकारी बॅंकेचे संस्थापक संचालकप्रा. घैसास काळाच्या पडद्याआडअहमदनगर
शहर सहकारी बॅंकेचे संस्थापक संचालक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, ज्येष्ठ अर्थ तज्ञ, माजी नगरसेवक प्रा. मुकुंद रामचंद्र घैसास (वय ८0) यांचे शनिवारी (दि. २८) सकाळी ९.१५ वाजण्याच्या दरम्यान निधन झाले. त्यांच्या मृतदेहावर सायंकाळी अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. प्राध्यापक घैसास हे शहर सहकारी बॅंकेचे संस्थापक संचालक होते. गेल्या १५-२0 दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर सावेडी रोडवरील दिपक हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते. त्यांना मधूमेहाचा त्रास होता, त्यांच्या पश्चात पत्नी, गिरीश, धनंजय, रवीकिरण असे तीन मुले, सुना, नातवंडे व एक भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच शहरातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी जावून अत्यंदर्शन घेतले. सावेडीतील प्रोफेसर कॉलनी येथील राहत्या घरापासून त्यांच्या अंत्ययात्रा काढण्यात आली. नवी पेठीतील शहर सहकारी बॅंकेच्या मुख्य कार्यालयात त्यांचे पार्थीव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
प्राध्यापक घैसास १९६५ पूर्वी सारडा महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सेवेत होते. त्यांनी एफसीए, एलएलबी, सीएस अशा अनेक पदव्या घेतल्या होत्या. सुरुवातीला नोकरी केल्यानंतर त्यांनी नोकरीचा राजीनामा देवून स्वत:चे क्लासेस सुरू केले, १ जुलै १९७१ रोजी प्रा. विवेक दाढे यांच्या समवेत त्यांनी शहर सहकारी बॅंकेच्या स्थापनेत पुढाकार घेतला. कोर्ट परिसर व सावेडी परिसरातून ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते










