संधी कोणीही आणून देत नाही, ती ओढूनच आणावी लागते : संधी दार वाजवत असते, पण त्याला उघड्या डोळ्यांनी बघण्याची क्षमता असली पाहिजे....
संधी दार वाजवत असते, पण त्याला उघड्या डोळ्यांनी बघण्याची क्षमता असली पाहिजे. संधी कोणीही आणून देत नाही, ती ओढूनच आणावी लागते असे मत ज्येष्ठ मार्केटिंग तज्ज्ञ प्रकाश बंग यांनी व्यक्त केले.
व्यवसायाला नवसंजीवनी देण्यासाठी चिंगारी ग्रुपच्या वतीने आयोजित पाठलाग स्वप्नांचा या व्याख्यानात प्रकाश बंग बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणो म्हणून उद्योजक नरेंद्र फिरोदिया, अभिनाथ शिंदे, खिलारी, विनय छाजेड, सुधीर लांडगे, सुहास रायकर, प्रदीप गांधी, प्रमोद कांबळे, डॉ.शरद कोलते उपस्थित होते.
बंग म्हणाले की, शोधकाची नजर ठेऊन संधी शोधाव्या लागतात. मार्केटिंगमधील मंडळी मोठमोठे शब्द वापरुन इतरांना गोंधळून टाकतात. पुस्तके वाचून नव्हे, तर डोके वापरुन केलेली मार्केटिंग यशस्वी ठरते. कोणत्याही पदार्थाची चव जिभेवरती नसून, ती डोक्यात असते. आपल्या उद्योगात असलेल्या शक्तीशाली गुणांवर लक्षकेंद्रीत केल्यास प्रगती साधता येते. उद्योगविश्वात आपले वेगळेपणाचा कप्पा बनवणो आवश्यक असल्याचे सांगून, वडा पाव केस स्टडीच्या माध्यमातून मार्केटिंगच्या विविध अवघड प्रश्नांचा त्यांनी सोप्या भाषेत उलगडा करुन दाखवला.
१0 वर्षानंतरचे भविष्य पाहून नियोजन करण्यापेक्षा उद्याचे भवितव्य पाहणोच फायद्याचे आहे. व्यावसायिकांनी आपल्या र्मयादा ओळखण्याचा सल्ला दिला.










