'वो काम करोगे तोही इस बार बचोगे हिवरे बाजार येथे केंद्र व राज्य शासनाच्या पर्यावरण विकास योजनेअंतर्गत ग्रामीण पर्यटन केंद्राचे उद...
हिवरे बाजार येथे केंद्र व राज्य शासनाच्या पर्यावरण विकास योजनेअंतर्गत ग्रामीण पर्यटन केंद्राचे उद््घाटन राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असलेले राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेता ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या भाषणात गृहराज्यमंत्री ना. राम शिंदे व भाजपचे खा. दिलीप गांधी यांना चांगल्याच कोपरखळ्या मारल्या.
ना. शिंदे यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला की, राज्यपालांनी जे पाणी उंच टेकडीवर प्याले ते आयुर्वेदिक असल्याचे ते म्हणाले. याबाबीचा आधार घेत ना. विखे यांनी ते पाणी पतंजलीच्या पाण्यापेक्षा आयुर्वेदिक होते का असा सवाल ना. शिंदेंना विचारताच सभागृहात हशा पिकला. तसेच खा. गांधी यांनी यावेळी हिंदीत भाषण करीत खासदारांनी जी गावे दत्तक घेतली आहेत त्यांचा विकास बचे कुचे दिनोंमे करना होगा असे म्हटले. यावर ना. विखे यांनी वो काम करोगे तोही इस बार बचोगे असे म्हणताच सर्वत्र हास्यकल्लोळ उडाला