जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत शुक्रवारी मुंबई : राज्यातील २६ जिल्हा परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुका २0१७ मध्ये होणार आहेत. ...
जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत शुक्रवारी
मुंबई : राज्यातील २६ जिल्हा परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुका २0१७ मध्ये होणार आहेत. या सर्व निवडणुका एकाच वेळी होणार असल्याने ही मिनी विधानसभा निवडणूक म्हणूनच ओळखली जाणार आहे. या जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासाठी शुक्रवारी आरक्षण सोडत निघणार आहे. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत ही सोडत निघणार आहे. पुढच्या वर्षी म्हणजे मार्च २0१७ मध्ये या २६ जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. या सर्व जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकाच वेळी होणार असल्याने मिनी विधानसभा निवडणूक म्हणूनच या निवडणुकीकडे पाहण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण कोणत्या सामाजिक घटकासाठी आरक्षित होते यावर राजकीय पक्षांची पुढची समीकरणे अवलंबून असणार आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात या सोडतीबद्दल प्रचंड औत्सुक्य आहे. १0 जून रोजी दुपारी २ वाजता ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत सहयाद्री अतिथीगृह येथे आरक्षण सोडत पार पडणार आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, अहमदनगर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली