वाळू तस्करांकडून तलाठय़ाला धक्काबुक्की आढळगाव :दौंड़ तालुक्यातील वाळू तस्करांनी श्रीगोंदा तालुक्यातील तलाठ्याला धक्काबुक्की केल्याची घटना ...
वाळू तस्करांकडून तलाठय़ाला धक्काबुक्की
आढळगाव :दौंड़ तालुक्यातील वाळू तस्करांनी श्रीगोंदा तालुक्यातील तलाठ्याला धक्काबुक्की केल्याची घटना आज सकाळी पेड़गाव येथे घडली. या घटनेच्या निषेध म्हणून महसूल कर्मचारी संघटनेने व तलाठी संघटनेने काळया फिती लावून निषेध व्यक्त केला. श्रीगोंदा तालुक्यातील पेड़गाव येथील भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळूउपसा होत असल्याची माहिती मंडळ अधिकारी शिंगाडे व तलाठी गराडे यांना मिळाली. त्यानुसार सकाळी ८ च्या सुमारास नदीपात्रात कारवाई करण्यासाठी गेले असता, नदीत जेसीबी व ट्रक आढळले. त्याचदरम्यान ट्रकवर कारवाई करण्यासाठी तलाठी गराडे गेले असता, दुचाकीवरून आलेल्या राजू खुडे (रा. शिरापूर, ता. दौंड़) व भैया शेख या दोघांनी तलाठी गराडे यांना धक्काबुक्की केली. श्रीगोंदा पोलिस ठाण्यात तलाठी गराडे यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेच्या निषेधार्थ महसूल कर्मचारी संघटना व तलाठी संघटना यांनी निषेध केला.