पैसे दुप्पट करून देणाऱ्या टोळीतील तिघांना जेरबंद सुपा :पैसे दुप्पट करून देणाऱ्या टोळीतील तिघांना जेरबंद करण्यात सुपा पोलिसांना यश आले...
पैसे दुप्पट करून देणाऱ्या टोळीतील तिघांना जेरबंद
सुपा :पैसे दुप्पट करून देणाऱ्या टोळीतील तिघांना जेरबंद करण्यात सुपा पोलिसांना यश आले असून, इतर तिघे साथीदार फरार झाले आहेत़ या तिघा आरोपींचा तपास पोलिसांकडून सुरू आहे़ पारनेर तालुक्यातील सुपा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाघुंडे शिवारात दिव्य दिवा देण्याचे आमिष दाखवून ग्राहकांची फसवणूक करणार्या टोळीचा सुपा पोलिसांनी पर्दाफाश करून तिघांना शिताफीने जेरबंद केले. या तिघांना न्यायालयापुढे हज़र केले असता, दि. २१ पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. याबाबत सुपा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी- दि. १५ रोजी सायंकाळी ६ वाज़ण्याच्या सुमारास वाघुंडे शिवारात पारनेर- विसापूर रोडवर म्हसणो फाट्याजवळ बाळकृष्ण सीताराम येडे रा. वाघोली (पुणो) व त्यांचा जोडीदार प्रशांत रमेश पिल्ले यांना मंगेश पटेल रा. मालाड (मुंबई) यांच्या ओळखीने कुकाणा, ता. नेवासा येथे एका शेतातील खोलीत दिव्य दिवा असून, तो विकत घेतल्यावर पैशामध्ये दुप्पट वाढ होते, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. या दिव्याची पडताळणी राजेश चव्हाण रा. पुणो हा सायंटिस्ट व विनोद मिश्रा हा मदतनिस हे अँटी रॅडिरेशन कोट घालून तपासणी करतात, असे सांगून फिर्यादीकडून दिव्याच्या किमतीपोटी २0 लाख रुपये व तपासणी फी म्हणून दीड लाख रुपये, असे एकूण २१ लाख ५0 हजार रुपये घेतले व त्यांना वाघुंडे शिवारात बोलावले. तेथे दिव्य दिवा न देता त्यांना एका लहान फायबर बॉक्समध्ये कापसामध्ये दिव्य दिवा असल्याचे भासवून त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी पोलिसांनी राजेंद्र दत्तात्रय चव्हाण (वय ४३) रा महंमदवाडी, पुणो,विनोदकुमार कत्तवारू मिश्रा (वय ४५) रा. ताडीवाला रोड, पुणो, मंगेश देवजी पटेल (वय ४५) रा. मालाड मुंबई, या तिघांना ताब्यात घेतले असून, इतर तीनज़ण फरार आहेत. याप्रकरणी बाळकृष्ण येडे यांच्या फिर्यादीवरून सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा रजि नं ८७/१६ भादवि क्र ४२0,१२0(ब),३४ प्रमाणो गुन्हा दाखल झाला आहे. सदर टोळीने आणखीही गुन्हे केल्याची शक्यता असून, या टोळीचा संबंध राज्यासह परराज्यात आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी, उपविभागीय पोलिस अधिकारी आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलिस निरीक्षक शामकांत सोमवंशी, उपनिरीक्षक सिदधेश्वर गोरे,बी.जे. पठाण व पथकातील चालक पोना. राहुल सपाट,हे कॉ दुर्गे, शिवजी ढवळे,सादिक शेख,पो ना हाडके, पो कॉ गांगर्डे,भारत इंगळे आदींनी ही धाडसी कारवाई केली.










