श्रीगोंदा नगराध्यक्षपदाची निवड लांबणीवर आढळगाव :श्रीगोंदा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची होणारी निवड आता लांबणीवर पडली असून, ती आता १0जून...
श्रीगोंदा नगराध्यक्षपदाची निवड लांबणीवर
आढळगाव :श्रीगोंदा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची होणारी निवड आता लांबणीवर पडली असून, ती आता १0जूनला होणार आहे. ४ जूनला होणार्या नगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी प्रशासनाने जो अजेंडा तयार केला होता. तो चुकीचा असल्यामुळे त्यावर उपनगराध्यक्ष आख्तर शेख यांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे काल आख्तर शेख, नगरसेविका अर्चना गोरे, मीना शेंडगे यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात धाव घेत त्यावर याचिका दाखल केली होती. त्याची उच्च न्यायालयाने तातडीने दखल घेवून अ.नगरचे जिल्हाधिकारी आणि श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी संतोष भोर, यांना नोटीस देऊन आज औरंगाबाद न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. आज या याचिकेवरील सुनावणीसाठी औरंगाबाद उच्च न्यायालयात जिल्हाधिकार्यांच्या वतीने कापडणीस हे हजार होते. त्यांनी न्यायालयासमोर नगराध्यक्ष निवडीचा नवीन कार्यक्रम सादर केला. त्यानुसार १0 जून रोजी ही निवडणूक घेण्याचे आदेश औरंगाबाद उच्च न्यायालयाने प्रशासनाला दिले आहेत.
यानुसार श्रीगोंदा नगराध्यक्षपदाची निवड आता १0 तारखेला होणार आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने अँड़नितीन गवारे यांनी तर, जिल्हाधिकार्यांच्या वतीने सरकारी वकील भगरे यांनी काम पाहिले. या सुनावणीसाठी श्रीगोंदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, उपनगराध्यक्ष आख्तर शेख, राजू गोरे, बापूराव सिदनकर, गोरख खेतमाळीस हे उपस्थित होते.श्रीगोंदा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक ही अर्थकारणासोबतच अनेक कारणांनी रंगतदार ठरणार असून, सत्ताधार्यांकडे काठावरचे बहूमत असल्यामुळे फोडाफोडीच्या आणि फुटाफुटीच्या राजकारणात कोण विजयी होतो. आणि नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते. याकडे सर्वच शहरवासीयांचे लक्ष लागले आहे