ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त निघोज मध्ये रक्तदान शिबीर प्रतिनिधी : पारनेर ( सागर आतकर ) ना. राधाकृष्ण विखे पाटील...
ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त निघोज मध्ये रक्तदान शिबीर
प्रतिनिधी : पारनेर (सागर आतकर)
ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त निघोज मध्ये रक्तदान शिबीर
ना. विखे पाटील हे सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या मनातील मुख्यमंत्री काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष राहुल झावरे यांचे प्रतिपादन
मा. श्री. संदीप पाटील वराळ व पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल फाऊंडेशन अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ५७ व्या वाढदिवस निमित्त निघोज येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मा.श्री.राहुल झावरे पाटील उपाध्यक्ष अ. नगर जिल्हा काँग्रेस आय यांचे हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन झाले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.भास्करराव शिरोळे ता. अध्यक्ष काँग्रेस आय सदस्य पं. स.पारनेर
हे होते. भास्करराव शिरोळे यांनी भविष्यात राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आय आणि काँग्रेस आघाडी सरकार यावं अशी अशा व्यक्त केली.
ना.राधाकृष्ण विखे पाटील हे सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या मनातील मुख्यमंत्री आहेत असे राहुल झावरे आपल्या भाषणात ते म्हणाले. यावेळी जेष्ठ नेते संभाजी रोहकले,शिवाजीराव सालके, जि. प.माजी सदस्य राजाराम एरंडे, तालुका युवकचे माजी अध्यक्ष महेश शिरोळे, तालुका युवकचे अध्यक्ष संदीप सालके, जगदीशशेठ गागरे,शैलेंद्र औटी,किरण ठुबे, वडनेरचे माजी उपसरपंच दिनेश बाबर,पारनेरचे युवा नेते बापूसाहेब शिंदे, निघोजचे माजी सरपंच संदीप पाटील वराळ,माजी उपसरपंच व सोसायटीचे माजी अध्यक्ष संजय लामखडे,ग्रामपंचायत सदस्य भिमाशेठ लामखडे,दत्तात्रय गुंड,मंगेश लाळगे, भास्कर वराळ,शीतल वराळ,सुमनताई वराळ,तालुका राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सोमनाथ वरखडे,तालुका विद्यार्थी संघटना राष्ट्रवादीचे अध्यक्ष निवृत्ती वरखडे,मळगंगा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विठ्ठलशेठ कवाद,सामजिक कार्यकर्ते राजेंद्र वराळ,मळगंगा पतसंस्थेचे संचालक राजेंद्र लाळगे,स्वामी समर्थ दूध डेअरींचे चेअरमन मंगेश वराळ,ग्रामपंचायतीचे माजी सदस्य संतोष इधाटे,कोंडीभाऊ वराळ,गजानन ठुबे, मळगंगा पतसंस्थेचे माजी उपाध्यक्ष बजरंग वराळ,निलेश घोडे ,अर्जुन लामखडे, निलेश खोबरे,माउली वरखडे,गंगा वरखडे आदी मान्यवर उपस्थित होते. तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.भास्कर शिरोळे यांनी संदीप पाटील वराळ याच्या युवा संघटनाचे कौतुक करताना सांगितले की, तालुक्यातील शे- सौवशे गावांमध्ये संदीप पाटलांचा मित्रपरिवार खूप मोठा आहे. अश्या प्रकारे युवकांना संघटित करून सर्वसामान्यांच्या सुखदुःखात भाग घेणारे कर्तृत्ववान नेतृत्व म्हणून यांचे नाव लौकिक तालुक्यात आहे.त्यांच्याच सामाजिक कार्यातून आज विखे पाटील यांचा वाढदिवस सामाजिक कामाच्या माध्यमातून साजरा होत आहे.आज राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. माझा वाढदिवस साजरा न करता त्या दिवासामध्ये गोरगरिबांच्या मदतीचा उपक्रम राबवावा असा संदेश विखे पाटील यांनी राज्यातील कार्यकर्त्यांना दिला आहे. त्याचेच अनुकरण संदीप पाटील वराळ व त्यांचे कार्यकर्ते करतात याचा आम्हाला अभिमान असल्याचे गौरवोउद्गार डॉ.शिरोळे यांनी काढले.माजी सरपंच संदीप पाटील वराळ यांनी प्रास्ताविक भाषणात राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्याची माहिती देऊन आज साजरा करीत असलेल्या सामजिक उपक्रमाची माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र लाळगे यांनी केले.सोमनाथ वरखडे यांनी आभार मानले.









