नगर-मनमाड रस्त्यावरील अपघातात अस्तगावच्या दोघांचा मृत्यू कोल्हार बुद्रुक येथे नगर-मनमाड महामार्गावर इंडिगो कारने पाण्याच्या रिकाम्या ट...
कोल्हार बुद्रुक येथे नगर-मनमाड महामार्गावर इंडिगो कारने पाण्याच्या रिकाम्या टँकरला जोराची धडक दिल्याने टँकर व त्यास जोडलेला ट्रॅक्टर दोघा जणांच्यावर कोसळला. यात ट्रॅक्टरचालक व मालक दोघेही जागीच चिरडून ठार झाले. दोघेही मयत अस्तगाव येथील रहिवासी होते. तसेच कारमधील गुहा येथील रहिवासी दोघे जण जखमी झाले.
ट्रॅक्टरमालक अशोक बाळासाहेब लोंढे व ट्रॅक्टरचालक बंडू बारकू अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. तर कारमधील जखमींची नावे धनंजय बाळकृष्ण कोळसे, प्रविण प्रभाकर कोळसे,दोघेही राहणार गुहा, ता.राहुरी अशी आहेत. काल रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कोल्हार बुद्रुक येथील निबे वस्तीनजीक नगर-मनमाड महामार्गावर हा जबर अपघात घडला