केडगाव वेशीजवळील अतिक्रमणे हटविली अहमदनगर :नगर-पुणे महामार्गावर केडगाव वेशीजवळ असलेली विक्रेत्यांची अतिक्रमणे शुक्रवारी (दि. ३) सकाळी महा...
केडगाव वेशीजवळील अतिक्रमणे हटविली
अहमदनगर :नगर-पुणे महामार्गावर केडगाव वेशीजवळ असलेली विक्रेत्यांची अतिक्रमणे शुक्रवारी (दि. ३) सकाळी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने पोलिस बंदोबस्तात हटविली. यामुळे नगर-पुणे महामार्गावरील कोंडी काहीप्रमाणात सुटल्याची चर्चा नागरीकांमध्ये सुरु होती.
नगर-पुणे महामार्गावर केडगाव वेशीलगत फळविक्रेत्यांची हातगाड्या लावून अतिक्रमणे करण्यात आली होती. यामुळे वाहतुकीला मोठय़ा प्रमाणात अडथळा निर्माण झाला होता. यामुळे अनेक छोटे-मोठे अपघातही झाल्याच्या घटना घडल्या होत्या. याबाबत नागरीकांनीच महापालिकेकडे तक्रारी केल्या होत्या. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी सकाळी पोलिस बंदोबस्तात केडगाव वेशी लगत असलेली फळविक्रेत्यांची अतिक्रमणे हटविली. यावेळी महापालिका अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख सुरेश इथापे यांच्यासह कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.