बालभवनच्या गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक अहमदनगर) : घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे इच्छाशक्ती असूनही मुलांना शिकण्यासाठी कसरत ...
बालभवनच्या गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक
|
| अहमदनगर) : घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे इच्छाशक्ती असूनही मुलांना शिकण्यासाठी कसरत व धडपड करावी लागते. मुलांना शिक्षणाचा विधायक मार्ग बालभवन ने दाखवला म्हणूनच मुलांना दहावी आणि बारावीचा टप्पा यशस्वीपणे पार करता असल्याचे डॉ. महेश मुळे यांनी सांगितले. बालभवनतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. भरत झवर, संतोष चव्हाण, बी. एच. पाटील, स्नेहालयचे सचिव राजीव गुजर, संचालक संजय बंदिष्टी, हनीफ शेख उपस्थित होते. या मुलांसाठी मेहनत घेणार्या स्वयंसेविका जया देशपांडे यांचा स्मृती चिन्हाने गौरविण्यात आले. यावेळी निकिता गायकवाड, पवन शेरकर व राहुल वैराळ या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. स्पर्धा परीक्षा व करियर दहावी व बारावी नंतर काय? याविषयावर डॉ. महेश मुळे व भरत झवर यांनी मुलांना मार्गदर्शन केले. बी. एच. पाटील यांनी अभियांत्रिकी विषयी माहिती दिली. यंदा बालभवनची ६५ मुले दहावी तर ३१ मुले परीक्षेला बसली होती. दहावीतील ६३, तर बारावीत २९ मुलांनी परीक्षेत यश मिळविले. प्रतीक्षा हिवाळे ८१ टक्के, निकिता गायकवाड ७८ टक्के, अश्रीन शेख ७७ टक्के गुण मिळवून अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय आले. बारावीत अश्विनी लोखंडे व संदीप सरोदे ६६ टक्के गुण मिळवून प्रथम आले. फयीम शेख ६५ टक्के मिळून द्वितीय, तर आकाश आपटे ६४ टक्के गुण मिळवून तृतीय आला. जयश्री शिंदे, राहुल पगारे, हसीना शेख, रुबिना शेख, वद्देपेल्ली, राजू पांढरे, विक्रम भगत, पल्लवी धाडगे यांनी कार्यक्रम यशस्वी केला. संगीता सानप यांनी सूत्रसंचालन केले. उषा खोल्लम यांनी आभार केले |










