मढी देवस्थानच्या विश्वस्ताला कर्मचार्याकडून धक्काबुक्की पाथर्डी :श्री क्षेत्र मढी कानिफनाथ देवस्थानमध्ये विश्वस्त व कर्मचारी यांच्या...
मढी देवस्थानच्या विश्वस्ताला कर्मचार्याकडून धक्काबुक्की
पाथर्डी :श्री क्षेत्र मढी कानिफनाथ देवस्थानमध्ये विश्वस्त व कर्मचारी यांच्यात किरकोळ करणांवरून वाद झाले. काम सांगितल्याचा राग आल्याने कर्मचार्याने विश्वस्ताला धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. कर्मचारी दत्तात्रय मरकड याच्याविरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात विश्वस्त आण्णासाहेब मरकड यांच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. संबंधित कर्मचार्यापासून आपल्या जीवाबरोबरच संस्थांनच्या मालमत्तेला धोका असल्याचे विश्वस्त मरकड यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

दत्तात्रय मरकड हा देवस्थानमध्ये वायरमन म्हणून काम करतो. आण्णासाहेब मरकड यांनी शुक्रवारी रात्री आठ वाजता देवस्थानच्या वाचनालयातील वीजपुरवठा बंद असून तो सुरू करण्यासाठी दत्तात्रय याला सांगितले होते. दत्तात्रय याला आणासाहेब यांनी काम सांगितल्याचा राग आला. दत्तात्रय याने आण्णासाहेब यांना थेट शिवीगाळ व दमदाटी सुरू केली. आण्णासाहेब यांनी यावर दत्तात्रय याला समज देण्याचा प्रय▪केला. त्यावर दत्तात्रय हा आण्णासाहेब यांच्यावर चालून येत धक्काबुक्की केली. आण्णासाहेब व दत्तात्रय यांच्यातील वाद मिटविण्यासाठी काहींनी मध्यस्थी केली. त्यानंतर वाद मिटले. आण्णासाहेब मरकड यांनी यावर पाथर्डी पोलिसांकडे तक्रार केली. आण्णासाहेब मरकड यांच्यासह देवस्थानचे अध्यक्ष शिवशंकर राजळे, विश्वस्त आप्पासाहेब मरकड, दत्तात्रय मरकड, सुधीर मरकड, ज्योती मरकड, डॉ. माणिक सारुक या सात जणांनी दत्तात्रय मरकड याच्या या वर्तनाविषयी लेखी तक्रार केली.
या तक्रारीत दत्तात्रय मरकड हा विश्वस्तांबरोबर भाविकांबरोबर देखील उद्धटपणे वागत असल्याचे म्हटले आहे. विश्वस्त मंडळाने दत्तात्रय याला दादागिरी करतो म्हणून यापूर्वी नोटीस देखील बजावली होती. दत्तात्रय याने लेखी माफिनामा देखील सादर केला होता. पण, दत्तात्रय याच्यात काहीच सुधारणा झाली नसल्याचे दिसते आहे. त्यामुळे दत्तात्रय मरकड याच्यापासून विश्वस्त मंडळातील सदस्यांच्या जिवीताबरोबरच संस्थानच्या मालमत्तेला धोका असल्याचे अर्जात म्हटले आहे. यानिमित्ताने मढी देवस्थामधील विश्वस्त व कर्मचारी यांच्यात संघर्ष सुरू झाल्याचे दिसते आहे.