हवामान : मागील चोवीस तासांत कोकण-गोव्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीन...
हवामान :
मागील चोवीस तासांत कोकण-गोव्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, मागील चोवीस तासांत कोकण-गोवा विभागातील रोहा येथे १८ से.मी., मुरूड व तळा प्रत्येकी ११ से.मी., माणगाव ८ से.मी., चिपळूण, दापोली हर्णे, खेड प्रत्येकी ५ से.मी., मुंबई (कुलाबा), मंडणगड, म्हसाळा, पालघर श्रीवर्धन, वाकवली, प्रत्येकी ४ से.मी., अलिबाग, सांगे, उरण येथे प्रत्येकी ३ से.मी., तसेच मध्य महाराष्ट्रातील जामखेड ६ से.मी., पाथर्डी ५ से.मी., अहमदनगर, आटपाडी, जाट, कर्जत, माळशिरस येथे प्रत्येकी ४ से.मी., मराठवाड्यातील धालेगाव पाथरी येथे ८ से.मी., माजलगाव, उस्मानाबाद पाटोदा येथे प्रत्येकी ७ से.मी., तर विदर्भातील सिंदखेडराजा, अकोला येथे प्रत्येकी ८ से.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.










