जिल्ह्यांतर्गत १७ पोलिस अधिकार्यांच्या बदल्या अहमदनगर : जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी जिल्ह्यांतर्गत १७ पोलिस अधिकार्यांच...


जिल्ह्यांतर्गत १७ पोलिस अधिकार्यांच्या बदल्या
अहमदनगर : जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी जिल्ह्यांतर्गत १७ पोलिस अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यात बुलढाणा येथून बदलून आलेले पो.नि. रविंद्र निकाळजे यांची तोफखाना पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. तोफखान्याचे पो.नि. प्रमोद वाघ यांची राहुरीला बदली केल्यानंतर हे पद रिक्त होते.
या बदल्यांमध्ये सोनई पोलिस ठाण्याच्या प्रभारीपदी जळगावहून बदली होऊन आलेले किरण शिंदे, राहत्याच्या प्रभारीपदी देविदास पवार, आश्वीचे राहुलकुमार पाटील यांची कोतवालीत बदली झाली आहे. योगेश कमाले यांची पाथर्डीहून आश्वीच्या प्रभारीपदी तर पप्पू कादरी यांची नियंत्रण कक्षातून कोपरगावला बदली करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक संगीता राऊत यांची शिर्डीहून संगमनेर शहर तर अन्सार शेख यांची संगमनेरहून श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
श्रीरामपूरचे दिलीप चौधरी यांची राहुरी, नियंत्रण कक्षातील सचिन राऊत यांची शेवगाव, भिमराव शिंदे यांची कोपरगाव शहर पोलिस ठाण्यातून आश्वीला बदली करण्यात आली आहे. नेवासा पोलिस ठाण्याचे शशिकांत जोशी यांची कोपरगावला तर शेवगावचे देविदास नेरकर यांची नगर तालुका पोलिस ठाण्यात बदली केली आहे. आश्वीचे जगदीश मुलगीर यांची शिर्डीला , श्रीरामपूरचे सुधीर पाटील यांची नेवासा नियंत्रण कक्षाचे गणेश हिवरकर यांची बेलवंडीला बदली करण्यात आली आहे.
शहरातील प्रमुख समजल्या जाणार्या तोफखाना पोलिस ठाण्याच्या रिक्तपदी पो.नि. रविंद्र निकाळजे यांची नियुक्ती केली असून निकाळजे हे तोफखाना पोलिस ठाण्यात रुजू झाले आहेत. नगर जिल्ह्यात इतर जिल्ह्यातून बदलून आलेले अनेक पोलिस अधिकारी अद्यापही हजर झालेले नाहीत. त्यातच अनेक पोलिस ठाण्यांचा कारभार हा प्रभारी अधिकार्यांवरच अवलंबून आहे. त्यातच नगर शहरातील कोतवाली पोलिस ठाण्याप्रमाणेच तोफखाना पोलिस ठाण्याचा विस्तार मोठा आहे. या पोलिस ठाण्याचा कार्यभार रिक्तच होता. तोफखान्याचे पो.नि. प्रमोद वाघ यांची राहुरीला बदली झाल्याने त्याजागी आता पो.नि.निकाळजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.










