महापौर पदाच्या निवडणुकीतकॉँग्रेस नगरसेवकांचा आज फैसला अहमदनगर : महापौर पदाच्या निवडणुकीत काय भूमिका घ्यायची, यासंदर्भात नगरसेवकांची मते ...
महापौर पदाच्या निवडणुकीतकॉँग्रेस नगरसेवकांचा आज फैसला
अहमदनगर : महापौर पदाच्या निवडणुकीत काय भूमिका घ्यायची, यासंदर्भात नगरसेवकांची मते जाणून घेण्याकरीता राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी कॉँग्रेस नगरसेवकांची बैठक रविवारी बोलविली आहे. बैठकीत काय निर्णय होतो, याकडे काँग्रेसह इतर राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.
महापौर पदाची २१ जून रोजी निवडणूक होत आहे. कॉँग्रेसचे ११ नगरसेवक महापालिकेत आहेत. भाजपमधील खासदार दिलीप गांधी गटाने राष्ट्रवादी-कॉँग्रेस आघाडीचा पाठिंबा घेऊन महापौर पद मिळविण्याचा प्रस्ताव बैठकीत मांडल्याने नगरच्या राजकीय क्षेत्रात शनिवारी मोठी खळबळ उडाली. सेनेच्या नेत्यांनी मातोश्रीवर धाव घेत मित्रपक्ष भाजप नेत्यांशी बोलणी केली आणि खासदार गांधी यांच्या मनसुब्याला आवर घालण्याचा प्रयत्न केला. मुंबईत दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांशी संपर्क करून युतीचा धर्म पाळण्याची गळ घातली.
या पार्श्वभूमीवर विखे यांनी काँग्रेस नगरसेवकांची बैठक रविवारी लोणी येथे बोलविली आहे. महापौर पदाच्या निवडणुकीत काय भूमिका घ्यायची, याचा निर्णय या बैठकीत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.