.शिवसेना-भाजप युती अभेद्य - आ. अनिल राठोड शिवसेना-भाजप युती ही अभेद्य असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावस...
.शिवसेना-भाजप युती अभेद्य - आ. अनिल राठोड
शिवसेना-भाजप युती ही अभेद्य असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पक्ष निरिक्षक सुरजितसिंग ठाकूर, पालकमंत्री ना. राम शिंदे, शिवसेना नेते अनिल देसाई यांच्याशी चर्चा होवून निर्णय झाल्याचे ते म्हणाले. पदाबाबत मतभेद असतात मात्र शेवटी पक्षनिष्ठा व तत्वे डोळ्यासमोर ठेवूनच निर्णय घ्यावा लागतो. शहर विकासाची कळकळ असणार्यांनी सत्ता स्थापनेपासून केलेले एखादे विकासकाम आठवून सांगावे. शेवटी जनता हे सर्व पहात असते आणि त्यांना सगळेच समजत असल्याचे ते म्हणाले.सत्ता मिळत असेल तर
स्थानिक पातळीवर निर्णय घ्या शिवसेनेच्यावतीने अर्ज दाखल करण्यासाठी महापौर पदाच्या उमेदवार सौ. सुरेखा संभाजी कदम व भाजपकडून उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यास दत्तात्रय कावरे व बाबासाहेब वाकळे यांनी हालचाची सुरू केल्या. भाजपकडून कावरे की वाकळे या नावांबाबत चर्चा सुरू होती. शेवटी कावरे यांच्या नावावर शिक्कमोर्तब करण्यात आले.
सावेडी उपनगरात उपमहापौर पद मिळावे म्हणून सेनेसोबत जाणार्या नगरसेवकांचे स्वप्न अखेर भंगले आहे. बाबासाहेब वाकळे हे या पदाचे प्रबळ उमेदवार मानले जात असताना कावरे यांचे नाव समोर आल्याने उपनगरातील नगरसेवकांचा चांगलाच हिरमोड झाला.
यावेळी भाजपचे गौतम दिक्षीत म्हणाले की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चा करण्यात आली होती. महापौर पदासह सत्ता मिळत असेल तर स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात यावा खा. दानवे यांनी स्पष्ट केले होते. त्यानूसारच हा निर्णय घेण्यात आला असून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करूनच ही आघाडी स्थापन करीत असल्याचे श्री. दिक्षीत म्हणाले.










