आरजी डिझायनर स्टुडिओचे १६ ला सई ताम्हणकरच्या हस्ते उद््घाटन अहमदनगर / प्रतिनिधी खास पुरुषांच्या डिझायनर वेअरसाठी मुंबईतील रेडिमेड...
आरजी डिझायनर स्टुडिओचे १६ ला
सई ताम्हणकरच्या हस्ते उद््घाटन
|
अहमदनगर / प्रतिनिधी
|
| खास पुरुषांच्या डिझायनर वेअरसाठी मुंबईतील रेडिमेड क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या आरजी डिझायनर स्टुडिओचे आता संगमनेरमध्ये पदार्पण होत आहे. गुरवार १६ जून रोजी सायं. ६ वा. अभिनेत्री सई ताम्हणकर यांच्या हस्ते उद््घाटन होत असल्याची माहिती आरजीचे संचालक गिरीष व राजेश चोईथरामाणी यांनी दिली. १९९७ पासून या क्षेत्रात चोईथरामाणी बंधु कार्यरत आहेत. गेल्या काही वर्षात पुरुषही आपल्या पेहेरावाबाबत अत्यंत जागरुक आणि चोखंदळ झाले आहेत. नामवंत ब्रॅँडबरोबरच आपल्या पसंतीचा डिझायनर ड्रेस असावा याकडे सर्वच वयोगटातील पुरुषांचा वाढता कल दिसून येतो आहे. या सर्व बदलांची नोंद घेत आरजी डिझायनर स्टुडिओने लग्नसमारंभातील खास कपडे तसेच क्लब वेअरची मोठी व्हरायटी आता संगमनेरमध्ये उपलब्ध करुन दिली आहे. याशिवाय ट्रॅडिशनल, फ्यूजन, वेस्टर्न डिझायनर ड्रेसची मोठी व्हरायटीसुद्धा इथे पहायला मिळणार आहे. त्यामुळे रेडिमेड पोशाखांसाठी आता मुंबईला जाण्याची संगमनेरवासियांना गरज पडणार नाही. |









