माझ्या काळातील मंज़ूर कामांची विरोधकांकडून उद्घाटने : पाचपुते श्रीगोंदा : ज्यांनी तालुक्यातील शेतकर्यांच्या डोळ्यांत धूळ फेकून आमद...
माझ्या काळातील मंज़ूर कामांची विरोधकांकडून उद्घाटने : पाचपुते
श्रीगोंदा : ज्यांनी तालुक्यातील शेतकर्यांच्या डोळ्यांत धूळ फेकून आमदारकी मिळवली व तालुक्याचे वाळवंट झाले, असा खोटा प्रचार केला तेच आज़ माझ्या काळात मंजूर झालेल्या विकास कामांची उद््घाटने करण्यात धन्यता मानतात, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे,अशी टीका माज़ीमंत्री बबनराव पाचपुते यांनी केली. कौठा येथील अनगरे रस्ता पूल बांधणो व गार - कौठा शिव रस्ता खडीकरण तसेच गार ते सूर्यवंशी वस्ती रस्ता डांबरीकरण कामाच्या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खरेदी -विक्री संघाचे संचालक गणपतराव परकाळे होते. या वेळी पाचपुते पुढे म्हणाले की, तालुक्यात भीमापट्टा अत्यंत प्रगतशील व पाण्यासाठी श्रीमंत म्हणून प्रसिद्ध भाग आहे. या भागामध्ये पाण्याच्या प्रश्नाबरोबर, विजेचा प्रश्न सोडवून हा भाग विकसित झाला आणि आता गावाबरोबरच वाड्या -वस्त्या जोडण्याचे काम गेल्या ३ वर्षांच्या काळात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या भागाच्या जि.प.सदस्या सौ.पाचपुते करता आहेत, ही अभिमानाची बाब आहे. विरोधकांवर टीका करताना ते पाचपुते म्हणाले, ज्यांनी तालुक्यातील शेतकर्यांच्या डोळ्यांत धूळ फेकून आमदारकी मिळवली व तालुक्याचे वाळवंट झाले, असा खोटा प्रचार केला तेच आज़ माझ्या काळात मंजूर झालेल्या कामांची उद््घाटने करण्यात धन्यता मानतात, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. या वेळी जि.प.सदस्या सौ.प्रतिभाताई पाचपुते, गणपतराव परकाळे, अशोकराव मचाले, कल्याण सूर्यवंशी, बबन शेळके यांची भाषणो झाली. कार्यक्रमास कौठ्याच्या सरपंच सौ.शिपलकर, माजी सरपंच हनुमंत गवळी, तुकाराम शिपलकर, बाळासाहेब पवार, गारचे उपसरपंच गोठू मगर, काकासाहेब शिपलकर, सतीश पाटील शिपलकर, प.स.चे इजिनअर कांगुणो, शिंदे, ग्रा.विकास अधिकारी गोरे तसेच परिसरातील नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक अशोकराव मचाले यांनी केले. माजी सरपंच सतीश पाटील शिपलकर यांनी आभार मानले.










