अण्णा हजारेंच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील अहमदनगर - पर्यावरण रक्षणाकरिता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या वाढ...
|
अण्णा हजारेंच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील
अहमदनगर - पर्यावरण रक्षणाकरिता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्यांना केशर आंब्याच्या दोनशे रोपांचे मोफत वाटप करुन, पर्यावरण स्वराज्य अभियानाची सुरुवात करण्यात आली. उपस्थितांनी शहराला इकोसिटी बनवण्याचा निर्धार व्यक्त करत, राष्ट्रीय त्रिशरण स्विकृतीचा शपथ घेतली.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे अप्पर जिल्हाधिकारी बी.एच.पालवे यांच्या हस्ते कर्मचार्यांना वृक्ष रोपणासाठी या रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, प्रांताधिकारी वामन कदम, तहसिलदार गणोश मरकड, अँड़कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, सुधीर भद्रे, सखाराम सरक, शाहिर कान्हू सुंबे आदि उपस्थित होते.
|










