दुचाकी चोरांनी पादचार्याचे साडेनऊ लाख लांबविले अहमदनगर : सावेडी येथील कोनार्क अपार्टमेंट येथे उदय शिवाजी काकडे यांच्या कार्या...
|
|
| दुचाकी चोरांनी पादचार्याचे साडेनऊ लाख लांबविलेअहमदनगर : सावेडी येथील कोनार्क अपार्टमेंट येथे उदय शिवाजी काकडे यांच्या कार्यालयाच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरांनी ४३ हजार ५00 रुपयांचे साहित्य सोमवारी चोरून नेले. उदय काकडे (रा. पाइपलाइन रोड, नगर) यांचे सावेडी येथे कोनार्क अपार्टमेंट येथे कार्यालय आहे. या कार्यालयाचे कुलूप तोडून चोरांनी आत प्रवेश केला. चोरांनी कार्यालयातील साहित्याची उचकापाचक केली. त्यानंतर कार्यालयात असलेला लॅपटॉप, डिजिटल कॅमेरा, आयफोन, हार्डडिक्स असे साहित्य चोरले. त्यानंतर चोर कार्यालयाचा दरवाजा तसाच ठेवून निघून गेले. चोर हे वाहनातून पसार झाल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यानुसार तोफखाना पोलिस तपास करत आहेत. |











