‘धनंजय मुंडेंना विरोधी पक्षनेतेपदावरुन हटवा’ औरंगाबाद – 17 जून : भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी राजीमान...
‘धनंजय मुंडेंना विरोधी पक्षनेतेपदावरुन हटवा’
औरंगाबाद – 17 जून : भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी राजीमाना दिला तशाच प्रकारे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनीही विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी नागरी हक्क संस्थेचे अध्यक्ष सुधीर कुलकर्णी यांनी केलीये.
धनंजय मुंडे यांच्या विरोधात बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. याबद्दल त्यांची एसआयटी मार्फत चौकशीही करण्यात येत होती. मात्र ही चौकशी नीट होत नसल्याचे ताशेरे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ओढल्याचंही त्यांनी
निदर्शनास आणून दिलंय. त्यामुळे आता डीजीपींच्या निदर्शनाखाली या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. भ्रष्टाचाराचे एवढे गंभीर आरोप असलेल्या माणसाला विरोधी पक्षनेतेपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याचं सांगत कुलकर्णी यांनी मुंडे यांना त्वरीत राजीनामा द्यावा अशी मागणी केलीये.










