वृक्षसंवर्धन होणो गरजेचे : त्रिपाठी वृक्षरोपण ही काळाची गरज असून, पर्यावरण समृध्दीसाठी झाडे लावणो गरजेचे आहे. वृक्षरोपणा बरोबर वृक्षसंव...
वृक्षसंवर्धन होणो गरजेचे : त्रिपाठी
वृक्षरोपण ही काळाची गरज असून, पर्यावरण समृध्दीसाठी झाडे लावणो गरजेचे आहे. वृक्षरोपणा बरोबर वृक्षसंवर्धनही होणो गरजेचे आहे. ही चळवळ व्यापक करण्यासाठी पत्रकार समाजात चेतना जागवित आहेत. पर्यावरण दिना निमित्त प्रेस क्लबच्या वतीने घेण्यात आलेला उपक्रम दिशादश्री असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलिस प्रमुख डॉ.सौरभ त्रिपाठी यांनी केले.जिल्हा पोलिस प्रमुख त्रिपाठी म्हणाले की, शासन स्तरावर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. पाण्याचे दुर्भिक्ष, उजाड होणारी शेती या पार्श्वभूमीवर मोठय़ा प्रमाणावर झाडे लावण्याची गरज आहे. हरितसृष्टी ही समृध्द सृष्टीची खरी ओळख आहे. लोकांनी स्वयंस्फूर्तीने या चळवळीत पुढे येऊन सहभागी होण्याचे त्यांनी आवाहन केले. प्रास्ताविकात महेश देशपांडे यांनी प्रेस क्लबच्या विविध सामाजिक उपक्रमाची माहिती दिली.पर्यावरण दिना निमित्त प्रेस क्लब व जिल्हा पोलिस दलाच्या वतीने पोलिस मुख्यालयात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा पोलिस प्रमुख त्रिपाठी बोलत होते. यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक रामा स्वामी, पोलिस उपाधीक्षक बजंरग बनसोडे, आनंद भोइटे, गजानन टोंम्पे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे शशीराज पाटोळे, अँड़शिवाजी कराळे आदीसह पत्रकार, छायाचित्रकार, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी, पोलिस अधिकारी व कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.










