जिल्हा बॅँकेची तिजोरी फोडल्याने तळेगाव दिघेमध्ये खळबळ तळेगाव दिघे: संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे असलेल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती...
जिल्हा बॅँकेची तिजोरी फोडल्याने तळेगाव दिघेमध्ये खळबळ
तळेगाव दिघे: संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे असलेल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जुन्या शाखेची पाठीमागील खिडकी तोडून अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्यावेळी शाखेत प्रवेश केला. चोरट्यांनी गॅसकटरच्या सहाय्याने बँकेची तिजोरी फोडली. मात्र 'डोंगर पोखरून उंदीर निघाला' अशी अवस्था झाली. तिजोरीत दमडीही रोकड ठेवलेली नसल्याने चोरट्यांची घोर निराशा झाली. आल्या पावली चोरटे पसार झाले. रविवार व सोमवार दरम्यानच्या रात्रीच्या सुमारास तळेगाव दिघे गावात भरवस्तीत हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.
संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या इमारतीत असलेल्या नगर जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेतील साहित्य कर्मचार्यांनी रविवारी नवीन ठिकाणच्या शाखेत हलविले; मात्र तिजोरी जुन्या शाखेतच होती. सोमवारी नवीन शाखेत जिल्हा बॅंकेचे कामकाज सुरु झाले. सोमवारी सकाळी अकाराच्या वाजण्याच्या सुमारास तळेगाव दिघे सोसायटीचे सचिव अनिल अप्पाजी दिघे सोसायटीच्या कार्यालयात आले असता जिल्हा बँकेच्या जुन्या शाखेची खिडकी कुणीतरी तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हा प्रकार चोरीचा असल्याने त्यांनी बँक शाखाधिकारी कैलास रणमाळे यांना माहिती दिली. त्यानंतर श्री. रणमाळे यांनी जुन्या शाखेत येवून पाहणी केली असता गॅस कटरच्या सहाय्याने तिजोरी फोडल्याचे त्यांना दिसून आले. सदर बँक शाखेची पाठीमागील खिडकी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला होता. गॅस कटरच्या सहाय्याने तिजोरीचा दरवाजा तोडण्यात आला होता. मात्र तिजोरीत एक रुपयाही रक्कम नव्हती. हा प्रकार श्री. रणमाळे यांनी वरिष्ठांना कळविला. जुन्या बँक शाखेच्या समोरच असलेल्या विजय दिघे यांच्या माऊली मेडिकलच्या सीसीटीव्ही कॅमेर्यात रविवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास दुचाकीवरून एकजण बँक शाखेजवळ आला, त्यानंतर तासभराने तो तेथून निघून थोडे दूर जात त्याने दुचाकी चालू करून निघून गेल्याचे रेकॉडिर्ंग झाले आहे. जिल्हा बँकेची तळेगाव शाखा गावातील चौफुली परिसरात हलविण्यात आली आहे, सर्व साहित्य हलविले मात्र तिजोरी जुन्याच शाखेत असल्याने पाळत ठेवून हा प्रकार घडल्याचा संशय आहे. नवीन शाखेत नवीन तिजोरी आणल्याने जुन्या शाखेतील तिजोरीत रोकड नव्हती. त्यामुळे चोरट्यांचा डाव फसला व त्यांना हात हालवत परतावे लागले. याप्रकरणी बँकेचे शाखाधिकारी कैलास रणमाळे फिर्याद देण्यासाठी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला गेले. दुपारी तीन वाजता ते फिर्याद देण्यासाठी गेले, मात्र सायंकाळ पयर्ंत फिर्याद दाखल करून घेण्यात आलेली नव्हती. याप्रकरणी सोमवारी सायंकाळी उशिरापयर्ंत गुन्हा नोंदविण्यात आलेला नव्हता. पोलीस स्टेशनला संपर्क साधला असता ठाणे अंमलदाराने गुन्हा दाखल झाल्यावर सांगू असे उत्तर दिले. यापूवीर्ही सदर शाखेचा दरवाजा तोडण्याचा प्रय▪झाला होता. त्यामुळे जिल्हा बँकेची तळेगाव दिघे शाखा चोरट्यांच्या रडारवर असल्याचे स्पष्ट होत आहे.