प्रतिनिधी : पारनेर सहा महिन्यांपूर्वी म्हस्केवाडी परिसरातील जिजाबाई गोरडे या महिलेला बिबट्याने ठार केले होते. अनेक शेतकऱ्यांचे पशुधनही ह...
प्रतिनिधी : पारनेर
सहा महिन्यांपूर्वी म्हस्केवाडी परिसरातील जिजाबाई गोरडे या महिलेला बिबट्याने ठार केले होते. अनेक शेतकऱ्यांचे पशुधनही ही बिबटयाने फस्त केले होते.या धक्क्यातून या परिसरातील लोक अजून सावरलेही नाही तोच पुन्हा एकदा या परिसरामध्ये बिबट्याचे दर्शन झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. परिसरातील १० किमी अंतरामध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ले केले. विठ्ठल दौलत म्हस्के यांना घराशेजारील शेतामध्ये बिबट्या दिसला. कैलास म्हातारबा पणमंद यांना घरी जाताना बिबट्या आडवा गेला. दीपक म्हस्के, श्रीकांत औटी, सुशील गोरडे यांना बिबट्याची पिल्ले आढळली तसेच बिबट्याने अनेकांना दर्शन दिले. बिबट्याच्या दर्शनाने म्हस्केवाडीसह परिसरातील चोंभूत,शिरापुर,अळकुटी भागांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. या भागांमध्ये बिबट्या असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामूळे या भागामध्ये पिंजरे लावण्याची मागणी पं. स.सदस्य डॉ.भास्कर शिरोळे,उद्योजक रामदास भोसले,सरपंच वैशाली म्हस्के,उपसरपंच डॉ. किरण पाणमंद,तंटामुक्ती अध्यक्ष सावळाशेठ पानमंद,सेवा सोसायटी चेअरमन बाळासाहेब गोरडे,व्हा.चेअरमन शिवाजी म्हस्के,विघ्नहर पतसंस्थेचे व्हा. चेअरमन सुदांम म्हस्के,राजेंद्र शिंदे प्रतिष्ठानचे आदिनाथ म्हस्के आदी ग्रामस्थांनी केली आहे.









