जय मल्हार गडावर पायर्यांचे काम प्रगतीपथावर आ. थोरातांचे प्रयत्न संगमनेर :माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून मोधळवा...
जय मल्हार गडावर पायर्यांचे काम प्रगतीपथावर आ. थोरातांचे प्रयत्न
संगमनेर :माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून मोधळवाडी, शिरापूर मार्गे असलेल्या नवीन बायपास वरील जल मल्हार गडावर सुमारे १000 घडी व पायर्यांचे काम प्रगतीपथावर आहे.
शिरापूर मोधळवाडी घाटावर असलेल्या डोंगरावर खंडोबाचे देवस्थान आहे. अतिशय रमनीय असलेल्या या घाटाला आ.बाळासाहेब थोरात यांनी मल्हार घाट नाव दिले आहे. सिंहस्थ कुंभमेळा निधीतून साकुर फाटा, मोधळवाडी, शिरापूर, हिवरगांव, देवगांव, रायते, संगमनेर असा नवीन बायपास रस्ता मंजूर करुन त्याचे काम पुर्ण करुन घेतले. यामुळे रस्त्याने या भागात वाहतूक वाढली असून आर्थिक उलाढाल व सुविधा वाढल्या आहेत. या मार्गावर असलेल्या मल्हार गड या देवस्थानच्या सुशोभिकरणसाठी त्यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. संगमनेर तालुक्यातील मोठे तीर्थक्षेत्र असणारे व हिरवाईने नटलेल्या परिसरात या डोंगरावर जाण्यासाठी सुमारे १000 घडी व पायर्या बसविण्याचे काम सुरु आहे. यासाठी पर्यटन विभागाकडून सदर कामास ३ लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. या सुशोभिकरणासाठी सुमारे १0 लाख निधी आवश्यक असून या मंदिराच्या पायर्या, वनराई, मंदीर, सभा मंडप यामुळे हे प्रति जेजूरी ठरणार आहेत.
आ.थोरात यांच्या या कामाबद्दल शिरापूर, मोधळवाडी, खंडेराव वाडी, साकूरफाटा, हिवरगांव,देवगांव, रायते येथील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.










