जिल्ह्यात वादळी वार्यासह पावसाची हजेरी अहमदनगर : आज होईल, उद्या होईल अशा आशेने वाट पाहत असलेल्या पावसाचे शुक्रवारी आगमन झाले. वादळी वा...
जिल्ह्यात वादळी वार्यासह पावसाची हजेरी
अहमदनगर : आज होईल, उद्या होईल अशा आशेने वाट पाहत असलेल्या पावसाचे शुक्रवारी आगमन झाले. वादळी वार्यासह पावसाचा शिडकावा झाल्याने आता खर्या अर्थाने पाऊस सुरु होईल, अशा प्रकारच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. यंदा पाऊस चांगल्या प्रकारे होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याच्या वेधशाळा वर्तवत आहेत.जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी शुक्रवारी वादळी वार्यासह अल्पसा पाऊस झाला. पाऊस कमी मात्र वादळच जास्त अशी परिस्थिती होती. वादळी वार्यामुळे नगर शहरातील जनजीवन दुपारनंतर विस्कळीत झाले होते. बंगाली चौकी परिसरातील वीजेच्या तारा तुटल्या. शहर व उपनगरातील मोठ मोठी झाडे उन्मळून पडली. घरांच्या भिंती पडून पत्रे उडाल्याचीही घटना घडली. सुदैवाने किरकोळ स्वरुपात नुकसान झाले असले तरी जिवित हानी झाली नसल्याचे समजते.
शुक्रवारी दिवसभर वातावरणात प्रचंड उकाडा होता. आज पाऊस पडेल, असे संकेत मिळत होते. दुपारनंतर पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होवून सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पावसाचा शिडकावा झाला. पावसाबरोबर वादळी वाराही जोरात होता. म्हणूनच अनेक ठिकाणी किरकोळ स्वरुपात नुकसान झाल्या. शहरप्रमाणे नगर तालुका तसेच जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी किरकोळ स्वरुपाचा पाऊस झाला. पाऊस कमी व वादळच जास्त असे चित्र होते. दरम्यान, आता पावसास सुरवात झाली आहे, पाऊस भरपूर होईल, अशी आशा शेतकरी बाळगून आहे.
काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यातील बर्यास भागात वादळी वार्यासह पावसाने हजेरी लावली.या पावसाने शेतकर्यांना दिलासा मिळाला मात्र, त्याचबरोबर नुकसानही झाले. काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कर्जत तालुक्यातील भांबोरा येथील संजय चव्हाण हे शेतकरी आपला मुलगा तुषार वय २0 वर्षे व पत्नीसह शेतात भेंडी तोडण्याचे काम करत होते. यावेळी वादळी वार्यासह पावसास सुरूवात झाली. त्यामुळे हे दाम्पत्य पावसापासून बचाव करण्यासाठी जवळच्या एका झाडाखाली थांबले. मात्र याचवेळी तुषार याच्या अंगावर वीज कोसळल्याने त्याचा यात मृत्यू झाला. या घटनेत त्याचे आईवडील बचावले आहेत. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.रात्री उशिरा कर्जत उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. तुषार हा एकुलता मुलगा होता. त्यास एक बहीण आहे.या घटनेने चव्हाण कुटुंबींयावर मोठे संकट कोसळले आहे.










