घोगरगाव येथील 'रोहयो'च्या कामास मजुरांचा प्रतिसाद श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव येथे सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्...
घोगरगाव येथील 'रोहयो'च्या कामास मजुरांचा प्रतिसाद
श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव येथे सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामास मजुरांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, सरासरी ९0 ते २00 मजुरांची कामावर नोंद आहे. यानिमित्ताने दुष्काळी परिस्थितीत मजुरांना रोजगारांची उत्तम संधी मिळत आहे.
घोगरगाव ग्रामपंचायतीने यापूर्वी खंडोबा मंदिर ते मांडवगण हा रस्ता व २४ लक्ष रुपये खर्चाचे भराव टाकण्याचे काम पूर्ण झाले. सध्या सुरू असलेल्या सोलापूर महामार्ग ते गौरी शंकर महादेव मंदिर या ५00 मीटर लांबीचे व ६.५ लक्ष रुपये खर्चाचे काम सुरू आहे. या कामास सरपंच डॉ. दिलीपराव भोस यांनी त्यांच्या सहकार्यांसह भेट देवून मज़ुरांच्या अडचणी समजावून घेतल्या.










