हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला राज्यातील कृषी विद्यापीठांची मान्यता स्थगित? मुंबई : सध्या सर्वदूर भेडसावणार्या दुष्काळा...
हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला
राज्यातील कृषी विद्यापीठांची मान्यता स्थगित?
मुंबई : सध्या सर्वदूर भेडसावणार्या दुष्काळातही आवश्यक त्या संशोधनाचा अभाव तसेच कृषीविषयक समस्यांना उत्तरे शोधण्याकामी पुरेसे गांभीर्य न दाखवल्याचा ठपका ठेवत भारतीय कृषी संशोधन परिषदेने राज्यातील चारही कृषी विद्यापीठांची मान्यता स्थगित केल्याचे वृत्त आहे. ही विद्यापीठे अत्यंत सुमार संशोधन करीत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. गेल्याच महिन्यात घेण्यात आलेल्या या निर्णयाची माहिती राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनाही देण्यात आली असली तरी विद्यापीठांनी आपल्या विद्यार्थ्यांना यासंबंधीची माहिती कळू दिली नसल्याचीही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांनाही कृषी संशोधन परिषदेच्या या निर्णयाचा फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या विद्यापीठांमध्ये सध्याचे व आगामी शैक्षणिक वर्षांत होणारे प्रवेशही बेकायदेशीर ठरवण्याची शक्यता असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीलाच लागण्याची शक्यता आहे. परभणी येथील वसंतराव नाईक मराठा कृषी विद्यापीठ, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अकोल्याचे डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ व दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ या विद्यापीठांची मान्यता रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येते. गेल्या महिन्याच्या पाच तारखेलाच हा निर्णय घेण्यात आला. या विद्यापीठांना कृषी संशोधन परिषदेमार्फत ४0 कोटी रुपयांचा निधी मिळतो. मात्र या विद्यापीठांना आता हा निधी मिळणार नसून तेथील संशोधन, अन्य सुविधा तसेच विस्तारकामांवरही परिणाम होण्याची भीती आहे. महाराष्ट्रातील दुष्काळ किंवा पिकांवरील अनेक रोगांवर या विद्यापीठांकडून ठोस उपाययोजना सुचवली जात नव्हती. दुष्काळाच्या काळातही कमी पाण्यात येणार्या पिकांवर संशोधन केले जात नसल्याचा आक्षेप परिषदेने घेतला