दिगंबर गेंट्याल दोन वर्षांसाठी नगरसह सहा जिल्ह्यातून हद्दपार अहमदनगर (प्रतिनिधी) : हिंदू राष्ट्रसेनेचा जिल्हाध्यक्ष दिगंबर लक्ष्मण गें...
| दिगंबर गेंट्याल दोन वर्षांसाठी नगरसह सहा जिल्ह्यातून हद्दपार |
अहमदनगर (प्रतिनिधी) :
|
| हिंदू राष्ट्रसेनेचा जिल्हाध्यक्ष दिगंबर लक्ष्मण गेंट्याल (वय ४२, रा. श्रमिकनगर, रा. सावेडी) याला नगर जिल्ह्यासह सहा जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने मंगळवारी (ता. १४) काढला आहे. प्रांतधिकारी वामन कदम यांच्यासमोर या संदर्भातील प्रस्तावावर सुनावणी झाली. अहमदनगर, बीड, पुणे, औंरगाबाद, नाशिक व सोलापूर या सहा जिल्ह्यातून गेंट्याल याला दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले आहे. |









