कर्ज़ाला कंटाळलेल्या शेतक र्याची विजेच्या तारांना स्पर्श करून आत्महत्या जामखेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणा, यामुळे आलेल्या नैर...
कर्ज़ाला कंटाळलेल्या शेतक र्याची विजेच्या तारांना स्पर्श करून आत्महत्या
जामखेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणा, यामुळे आलेल्या नैराश्यातून तालुक्यातील देवदैठण येथील शेतकरी रमेश उर्फ सूर्यकांत परमेश्वर भोरे (वय ४0) याने विजेच्या खांबावरील तारांना स्पर्श करून आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी अकराच्या सुमारास घडली.
रमेश ऊर्फ सूर्यकांत याच्यावर दोन वर्षांपासून देवदैठण सेवा संस्थेचे थकित कर्ज होते. तसेच बॅंकेकडून गाई खरेदी करण्यासाठी कर्ज घेतले होते. खासगी लोकांचे देणो वाढले होते. त्यातच तीन वर्षांपासून सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतातून उत्पन्न मिळाले नाही. यामुळे कर्ज़ फेडणे मुश्किल झाले होते. मयत रमेश याच्यामागे तीन मुली व दोन मुले, पत्नी, आई वडील असा परिवार आहे. तसेच दोन मुलींचे लग्न झाले होते. सततची नापिकी, कर्जबाजारीपणा व देणोकरी, यामुळे मयत शेतकरी भोरे याने नैराश्य आले होते. या नैराश्यातून त्याने विजेच्या खांबावरील तारांना चिकटून आत्महत्या केली असल्याचे गावकर्.य़ांनी सांगितले. मयत भोरे यांच्या मृतदेहाचे जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून सायंकाळी उशिरा देवदैठणा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
|











