अपहरण झालेल्या तरुणाचा मृतदेह फाशी घेतलेल्या अवस्थेत संशयावरून महिलेसह दोन जणांना अटक पारनेर : (सागर अतकर ) _प्रतिनिधी खडकवाडी (ता.पारनेर) ...
अपहरण झालेल्या तरुणाचा मृतदेह फाशी घेतलेल्या अवस्थेत
संशयावरून महिलेसह दोन जणांना अटक
पारनेर : (सागर अतकर ) _प्रतिनिधी
खडकवाडी (ता.पारनेर) येथून अपहरण झालेल्या संतोष साहेबराव ढोकळे (वय ३२) या तरुणाचा मृतदेह घारगाव (ता संगमनेर) ते साकुर मार्गावरील नांदूर गावाच्या शिवारात फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळला. या प्रकरणी पारनेर पोलिसांनी संशयावरून एका महिलेसह दोन व्यक्तींना अटक केली. मिळालेली माहिती :
परिसरातील आमलेवाडी येथील सीमा राजेंद्र आमले यांची बहीण खडकवाडी येथील रुग्णलयात उपचार घेत होती. त्यावेळी संतोषने तिची छेड काढल्याचा कारणावरून सीमा व अन्य चार जणांनी रविवारी (ता.२६)रात्री नऊ वाजता संतोषचे अपहरण केले. अशी फिर्याद त्याच दिवशी रात्री यशवंत भाऊसाहेब हुलावले यांनी पारनेर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार अपहरणाचा गुन्हाही नोंदवण्यात आला. दरम्यान फिर्यादिनी संतोषला पळवून नेणाऱ्यांचा पाठलागही केला. यादरम्यान संतोषचा मृतदेह नांदूर गावाजवळील घाटात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेहाची पाठीवर खरचटल्याच्या खुणा आढल्याने मारहाण करून त्याचा खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत घारगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीचा अहवाल आल्यानंतरच तपासणीची दिशा ठरेल असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान या गुन्ह्यात पारनेर पोलिसांनी सीमा राजेंद्र आमले (रा.आमलेवाडी ता. संगमनेर) आणि पोपट राजाराम ढोले ( रा.येणारे,ता.जुन्नर जि. पुणे)यांना अटक केली आहे.









