शहर विकासात शेतकरी व कामगारांची भूमिका महत्वाची : कॉ.बन्सी सातपुते आपल्या शहराची वाटचाल उन्नतीकडे होत असून पुणो, मुंबई, नासिक, औरंगाबाद...
शहर विकासात शेतकरी व कामगारांची भूमिका महत्वाची : कॉ.बन्सी सातपुते
आपल्या शहराची वाटचाल उन्नतीकडे होत असून पुणो, मुंबई, नासिक, औरंगाबादनंतर नगरच भरभराटीकडे जाणार आहे. येत्या काळात आपली एमआयडीसी भरभराटीस येणार असून त्यात शेतकरी व कामगारांची भुमिका महत्वाची आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय किसान सभेचे अँड़ कॉ.बन्सी सातपुते यांनी केले.
नागापूर एमआयडीसीतील इंडोस्कल्प एटोकाँप प्रा.ली. या कारखान्यातील आयटक संलग्न क्रांतिसिंह कामगार संघटनेच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कामगार बांधवांनी आपल्या न्याय्य हक्कासाठी भांडलेच पाहिजे, परंतु हे करत असताना कारखान्याच्या हिताचे संरक्षणही करणो गरजेचे आहे.कॉ. सुभाष लांडे म्हणाले की, मार्क्सने दिलेली जगातील कामगारांनो एक व्हा ही हाक आपल्याला प्रत्यक्षात अंमलात आणायची आहे. त्यासाठी सर्व कामगारांनी हातात हात घालून एकीने प्रश्न सोडवायचे असल्याचे ते म्हणाले.
क्रांतिसिंहचे अध्यक्ष कॉ. बहिरनाथ वाकळे यांनी यावेळी एका पाळीतील कामगारांना कारखाना व्यवस्थापनाने गेटला कुलूप लावून कार्यक्रमास बाहेर येण्यास मज्जाव केल्याचा निषेध नोंदविला. त्यावेळी ते म्हणाले आपल्या एमआयडीसीतील कामगार बांधवांना लाल झेंड्याच्या कामगार संघटनांची अत्यंत गरज आहे. या भागात इतर
बर्याच संघटना कारखानदारांच्या डमी संघटना असल्याची भुमिका वठवतात. त्या कामगारांचे हित करण्याऐवजी नुकसानच करतात. त्यामुळे कामगारांनी अभ्यासू व विश्वासू कम्युनिस्ट नेतृत्वासोबत काम करून आपले प्रश्न सोडवावेत, असे आवाहन केले.
कॉ.महादेव पालवे यांनी कामगारांना कम्युनिस्ट भुमिका समजावून सांगितली. यावेळी कंपनी युनिटचे अध्यक्ष विकास गेरंगे, सचीन गेरंगे, दत्ता शितोळे, संभाजी ब्रिगेडचे अरविंद गेरंगे यांनी कामगारांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कॉ.रामदास वागस्कर यांनी केले तर आभार कॉ. संदीप सकट यांनी मानले.
कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी कॉ. नानासाहेब कदम, कॉ.अतुल महारनवर, कॉ.संदीप पवार, कॉ.दत्ता वडवणीकर, कॉ.लहू लोणकर, कॉ.अविनाश साठे, कॉ.अविनाश कर्पे, कॉ.महेश पठारे, राम गवळी, सागर गवळी, अतुल नरवडे आदींनी परिश्रम घेतले










