Archive Pages Design$type=blogging

चेअरमनसह १३ जणांविरुद्ध गुन्हा मार्तण्ड नागरिक पतसंस्थेच्या

चेअरमनसह १३ जणांविरुद्ध गुन्हा मार्तण्ड नागरिक पतसंस्थेच्या अहमदनगर :मार्तण्ड नागरी पतसंस्थेत ठेवलेल्या मुदत ठेवीची १८ लाख ३८ हजार ८४0 रु...

चेअरमनसह १३ जणांविरुद्ध गुन्हा मार्तण्ड नागरिक पतसंस्थेच्या
अहमदनगर :मार्तण्ड नागरी पतसंस्थेत ठेवलेल्या मुदत ठेवीची १८ लाख ३८ हजार ८४0 रुपयांची रक्कम मुदत संपल्यानंतरही खातेदारांना देण्यास टाळाटाळ करून रक्कम न देता फसवणूक केल्याप्रकरणी पतसंस्थेचे चेअरमन विशाल निंबाळकर यांच्यासह १३ जणांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ही घटना १ डिसेंबर २0१५ ते ९ जून २0१६ दरम्यान घडली.
याबाबत पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, नितीन सुभाष कुकडे (रा. गायत्री मंदिराजवळ, महाजन गल्ली, नगर) हे मार्तण्ड नागरी पतसंस्थेच्या स्थापनेपासून खातेदार आहेत. त्यांनी त्यांची पत्नी, मुलगा व ते स्वत: यांच्या नावाने मार्तण्ड पतसंस्थेत मुदत ठेव ठेवली. त्या मुदत ठेवीच्या रितसर पावत्याही घेतल्या. त्या मुदत ठेवीची मुदत संपल्यानंतर कुकडे यांनी पतसंस्थेकडून १८ लाख ३८ हजार ८४0 रुपये येणे रक्कम काढण्यासाठी गेले असता पतसंस्थेने एवढी रक्कम पतसंस्थेत नाही, कर्जवसुली झाली नाही, साहेब नाहीत अशी कारणे सांगून पैसे देण्यास टाळाटाळ केली. याबाबत कुकडे यांनी डिडीआर कार्यालयाकडे चौकशी केली, त्यानंतर पतसंस्थेला वकीलामार्फत नोटीस पाठवून पैशाची मागणी केली. मात्र पतसंस्थेने पैसे न देता त्यांची फसवणूक केली. याबाबत कोतवाली पोलिसांनी
नितीन कुकडे यांच्या फिर्यादीवरून पतसंस्थेचे चेअरमन विशाल दिलीप निंबाळकर (रा. गाडेकर चौक, निर्मलनगर, नगर) व्हा. चेअरमन विनायक पांडूरंग नन्नवरे (रा. माळीवाडा), संचालक दिलीप बाबुराव निंबाळकर, निलेश नानासाहेब पाटील (रा. लाडजळगाव, शेवगाव), धनंजय शरद तवार (रा. लाडजळगाव, शेवगाव), हेमंत दामू घोडे (रा. अरणगाव, नगर)संदिप दिलीप काटे (रा. अरणगाव, नगर), विनायक माधवराव मुसळे (रा. माणकर गल्ली, दिल्लीगेट), मंगल दिलीप निंबाळकर, तृप्ती विशाल निंबाळकर (रा. गाडेकर चौक, निर्मलनगर) राजेंद्र संताजी पाटील (रा. लाडजळगाव, शेवगाव), वैभव पद्माकर मुसळे (रा. कोर्टगल्ली, नगर) प्रमोद उत्तम फोपसे (रा. लाडजळगाव, शेवगाव) यांच्याविरुद्ध भा.द. वि. ४२0, ३४ प्रमाणे
फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पो. नि. सोमनाथ मालकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गजानन करेवाड हे करीत आहेत

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: चेअरमनसह १३ जणांविरुद्ध गुन्हा मार्तण्ड नागरिक पतसंस्थेच्या
चेअरमनसह १३ जणांविरुद्ध गुन्हा मार्तण्ड नागरिक पतसंस्थेच्या
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi0ieSxaRVfDq7kvMpdvKjbaPMEyNH2tR-I_FF-jfkT76kpfg87qDXVxGLUbCGS98zJoP3xcw1Sq3l7FVCIpRS_S8kWFO0lPKGtn3X6rUDZHacEzTRqRnimoYtA0oPC8xCIDK5mCPDpTEuD/s1600/1.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi0ieSxaRVfDq7kvMpdvKjbaPMEyNH2tR-I_FF-jfkT76kpfg87qDXVxGLUbCGS98zJoP3xcw1Sq3l7FVCIpRS_S8kWFO0lPKGtn3X6rUDZHacEzTRqRnimoYtA0oPC8xCIDK5mCPDpTEuD/s72-c/1.png
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/06/blog-post_45.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/06/blog-post_45.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago