तरुणांच्या पुढाकारातून साकाराला पाण्याचा हौद खरवंडी कासार- भीषण उन्हाळ्याची तीव्रता लक्षात दुष्काळात लोकांना पाणी मिळण्यासाठी येथीलआठ दह...
तरुणांच्या पुढाकारातून साकाराला पाण्याचा हौद
खरवंडी कासार- भीषण उन्हाळ्याची तीव्रता लक्षात दुष्काळात लोकांना पाणी मिळण्यासाठी येथीलआठ दहा तरुणांनी एकत्र येऊन व खर्चाने तीस हजार लिटर क्षमतेचा पाण्याचा हौद मालेवाडी ग्रामस्थांसाठी बांधून दिला आहे. यामुळे गावातील महिलांची पाणी भरण्याची सोय झाली आहे. या तरुणांनी एकत्र येऊन एक लाख रुपये वर्गणी करून हा हौद बांधून दिला आहे. यासाठी मालेवाडी जिल्हा परिषद शाळेजवळ मोहन दराडे यांनी स्व.मालकीची जागा देऊन नवा आदर्श निर्माण केला.पूर्वी सार्वजनिक विहिरीवरून पाणी भरण्यासाठी महिलांना मोठी कसरत करावी लागत असे. तो त्रास पाहून तरुणांनी एकत्र येऊन ही समस्या सोडविण्याचा निर्णय घेतला. याकामी संदीप खेडकर,ज्ञानेश्वर खेडकर,खरवंडी कासार येथील व्यापारी दीपक ढाकणो,महारुद्र कीर्तने,संजय जवरे,बाबासाहेब दराडे यांचे सहकार्य लाभले.










