'मूलभूत' कामांच्या निविदा मंजुरीसाठी स्थायीची सभा मूलभूत सोयीसुविधा विकास निधी अंतर्गतच्या जवळपास ४३ कामांच्या निविदा मंजुरीसाठी ...
'मूलभूत' कामांच्या निविदा मंजुरीसाठी स्थायीची सभामूलभूत सोयीसुविधा विकास निधी अंतर्गतच्या जवळपास ४३ कामांच्या निविदा मंजुरीसाठी शनिवारी (ता. ४) दुपारी १ वा. स्थायी समितीचे सभापती गणेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली मनपा स्थायी समितीच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
मूलभूतअंतर्गत रु. ४0 कोटी खर्चाच्या एकूण ११३ विविध विकासकामांबाबत मनपाने निविदा प्रकिया राबविली होती. यामध्ये मनपाचे नूतन आयुक्त दिलीप गावडे यांनी मनपाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता जादा दराने निविदा मंजूर न करण्याचे तसेच ठेकेदार काम करत नसेल तर फेरनिविदा काढण्याचे निर्देश दिले होते. आयुक्त गावडे यांच्या या भूमिकेमुळे निविदा दाखल केलेल्या ठेकेदारांनी निविदा दरात काम करण्याचे लेखी पत्र एकाच दिवसात मनपाला सादर केल्याने मनपाचे मोठे आर्थिक नुकसान टळण्यास मदत झाली आहे. स्थायी समितीच्या मंजुरीसाठीच्या ४३ कामांचा निविदांमध्ये शहरातील विविध भागातील रस्ते तसेच ड्रेनेजलाईन, ओपनस्पेसमध्ये उद्यान विकसित करणे या कामांचा समावेश आहे. तसेच प्रोफेसर कॉलनी ते हॉटेल संतसेना रस्त्याचे डांबरीकरण तसेच महाराष्ट सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत बिशप लॉईड कॉलनी येथील ओपन स्पेसमध्ये सभामंडप व वॉलकंपाऊंड या दोन कामांच्या निविदाही स्थायीच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. मूलभूतमधील प्रमुख रस्त्यांच्या कामांमध्ये गुलमोहर रोड पोलिस चौकी ते नवीन कलेक्टर ऑफीस रस्ता डांबरीकरण तसेच शास्त्रीनगर, जयहिंदनगर, शिवसागरनगर, अंतर्गतच्या रस्त्यांचे डांबरीकरण, मल्हार चौक ते कायनेटीक चौक रस्ता डांबरीकरण, स्वस्तिक चौक ते अफाली मार्गे आनंदधाम रस्त्याचे डांबरीकरण आदींचा समावेश आहे.










