ढवळपुरी (ता.पारनेर) येथे दारूबंदीच्या विषयावर घेण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत गावात व गावाच्या परिसरात सुरू असलेस्या अवैध दारू वि...
ढवळपुरी (ता.पारनेर) येथे
दारूबंदीच्या विषयावर घेण्यात आलेल्या
विशेष ग्रामसभेत गावात व गावाच्या परिसरात सुरू
असलेस्या अवैध दारू विक्रीवर
बंदी घालण्याचा ठराव सर्वानुमते संमत
करण्यात आला. या ग्रामसभेच्या
अध्यक्षस्थानी सरपंच
सौ.लीलाताई घोगरे होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून दारूबंदी अभियानाच्या
जिल्हाध्यक्ष रंजना गवांदे, नगर येथील न्यायाधार संस्थेच्या डॉ. निर्मला
चौधरी, बबनराव कवाद तसेच धन्वंतरी मेडिकल फौंडेशनचे डॉ.सईद
काझी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकात येथील
रहिवाशी व पारनेर पंचायत समितीचे बचत गटांचे तालुका समन्वयक विकास
जाधव यांनी दारूबंदीच्या ठरावाबरोबरच गावात पोलिस चौकी सुरू
करणो, ग्रामस्वच्छता अभियान राबविणो, गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी
महिलांच्या सहभागातून स्वच्छतागृह बांधणो, वृक्षतोड थांबविणो व आदर्श गावासाठी
सर्वांनी एकत्र येऊन काम करणो आदी विषय ग्रामसभेसमोर मांडले. हे
सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. याप्रसंगी डॉ.सईद काझी
यांनी दारूमुळे होणारे हाल व त्या कुटुंबाची होणारी
हानी यासंदर्भात मार्गदर्शन केले तर या अभियानासाठी पन्नास हजार
रुपयांची देणगी जाहीर केली. बबनराव कवाद
यांनी या आंदोलनात आलेले अनुभव मांडले. महिलांच्या वतीने बचत गटाच्या
कल्पना ठोकळ यांनी तर आश्रमशाळेतील शिक्षक श्री.महांडुळे
यांनी व्यसनमुक्ती विषयावर मार्गदर्शन केले. येथील
ग्रामसभेचे आयोजक अहिल्यादेवी प्रतिष्ठाणचे सर्व तरुण कार्यकर्ते व शालेय
विद्यार्थ्यांनी दारूबंदीची शपथ घेतली.
याप्रसंगी दारूबंदी चळवळीच्या जिल्हाध्यक्षा रंजना गवांदे, डॉ.
निर्मला चौधरी यांनीही मार्गदर्शन केले.
या वेळी राज्य उत्पादन शुल्कचे नगरचे पो.नि.घायतडक, त्यांचे सर्व
सहकारी, गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते पांडे गुरुजी, पोलिस
पाटील अहमद पटेल, चंद्रकांत चौगुले, सुखदेव चितळकर, भाऊ बिडे, रामदास भालेराव,
ग्रामपंचायत सदस्य सौ.शालन पांडे, इंदुबाई बिडे, विमल भालेराव, शुभांगी आदमाने,
जयश्री चौधरी, बाबाजी चौधरी तसेच
अहिल्यादेवी प्रतिष्ठाणचे नीलेश पारखे, संतोष थोरात व त्यांचे सर्व
सहकारी तसेच हजारोंच्या संख्येने महिला, पुरूष व तरुण या वेळी उपस्थित
होते. सेवानवृत्त शिक्षक रंगनाथ पारखे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.









