पोलिसांकडून १५ गोवंश जनावरांची सुटका संगमनेर : शहर पोलिसांनी जमजम कॉलनी परिसरात छापा टाकून कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या १३ गायींसह १५ गो...
संगमनेर : शहर पोलिसांनी जमजम कॉलनी परिसरात छापा टाकून कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या १३ गायींसह १५ गोवंश जनावरांची सुटका केली. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.
शहरात कत्तलीसाठी गोवंश जनावरे आणली जात असल्याची गुप्त खबर शहर पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांना मिळाली. त्यानुसार ओमासे यांनी बुधवारी रात्री उशिरा पोलीस पथकासह जमजम कॉलनी परिसरात छापा टाकला. छाप्या दरम्यान जुन्या कोल्हेवाडी रोडनजीक काटवनात निर्दयीपणे बांधून ठेवलेल्या १३ गायी व २ बैल अशी एकूण १५ गोवंश जनावरे जप्त केली. पकडलेली जनावरे जीवदया गोरक्षण मंडळाकडे पाठविण्यात आल्याने त्यांना जीवदान मिळाले आहे.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल महेश कचे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसात महाराष्ट्र गोवंश हत्याबंदी कायद्यान्वये समीर हसन कुरेशी (रा. भारतनगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल ईस्माइल शेख करीत आहेत.










