श्रीगोंद्यात राजकीय हालचाली गतिमान श्रीगोंदा : श्रीगोंदाच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक दहा जून रोजी होणार आहे. या निवडीसाठी राजकीय समीकरणे ...
श्रीगोंद्यात राजकीय हालचाली गतिमान
श्रीगोंदा : श्रीगोंदाच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक दहा जून रोजी होणार आहे. या निवडीसाठी राजकीय समीकरणे जुळविण्यासाठी आमदार राहुल जगताप यांनी डावपेच टाकण्यास सुरू केली आहे. नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांचे मन वळविण्यासाठी जि. प. उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांची मदत घेण्यात येणार आहे. यावर राजेंद्र नागवडे कोणती भूमिका घेतात? याकडे शहराचे लक्ष लागून आहे.
नगराध्यक्षपदाच्या निवडणूक कार्यक्रमाचा अजेंडा नियमानुसार मिळाला नाही, हा धागा पकडून आमदार राहुल जगताप यांचे समर्थक, उपनगराध्यक्ष अख्तारभाई शेख, अर्चना गोरे, मीना शेंडगे यांनी या निवडणूक कार्यक्रमाला औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून नगराध्यक्षपदाची निवडणूक ४ ऐवजी १० जूनला घ्यावी, असे आदेश दिले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे सहलीवर गेलेले नगरसेवक पुन्हा परतले आहेत. परिणामी आता शहरात पुन्हा राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. पालिकेत आ. जगताप व नागवडे गटाचे ११ तर माजी मंत्री बबनराव पाचपुते, भोस गटाचे ८ नगरसेवक आहेत.