गैरहजर राहणार्यांचे पद रद्द करा : समद खान अहमदनगर :महापौर निवडणुकीत उपस्थित न राहणार्या नगरसेवकांचे पद रद्द करण्याची कारवाई करण्यात ...
गैरहजर राहणार्यांचे पद रद्द करा : समद खान
अहमदनगर :महापौर निवडणुकीत उपस्थित न राहणार्या नगरसेवकांचे पद रद्द करण्याची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शहर विकास आघाडीचे गटनेते नगरसेवक समद खान यांनी केली आहे. खान यांनी यासंदर्भात नाशिकच्या विभागीय आयुक्तांना निवेदन दिले आहे.
यापूर्वी झालेल्या महापौर निवडणुकीत तत्कालीन उमेदवार अभिषेक कळमकर यांना मतदान करण्यासंदर्भात पक्षादेश काढला होता. यावेळी प्रस्तृत गटातील नोंदणीकृत सदस्य बाळासाहेब बोराटे हे पक्षादेशाची बजावणी झाल्यानंतरही आजारपणाचे खोटे कारण देवून गैरहजर राहिले. त्यांच्याविरुध्द नगरसेवक पद्द रद्द करण्याची याचिका दाखल केली होती. या याचिकेविरुध्द संबंधित नगरसेवकांनी उच्च न्यायालयात अपिल केले. या अपिलात विभागीय आयुक्त कार्यालयात हजर होईपर्यंत स्थगिती मिळविली आहे. या महापौर निवडणुकीत सदर नगरसेवक तसेच नोंदणीकृत गटातील अन्य लोक पक्षादेश न पाळता विरोधकांच्या अमिषाने निवडणूक पूर्व सहलीला गेल्याबद्दल समजते. यामुळे भ्रष्ट मार्गाने निवडणूक होवून जनतेच्या विश्वासाला मूठमाती देण्याचा हा प्रकार आहे. अशा प्रकारच्या लोकप्रतिनिधींविरुध्द तत्काळ पद रद्द करण्याची कारवाई करण्यात यावी, असे खान यांनी निवेदनात म्हटले आहे










