शहर व उपनगरच्या विकासासाठी कटिबध्द ' शहर विकासाच्या दृष्टीकोनातून यापुढे सकारात्मक विचारातून वाटचाल करणार असून, स्वच्छ, सुंदर श...
शहर व उपनगरच्या विकासासाठी कटिबध्द'
शहर विकासाच्या दृष्टीकोनातून यापुढे सकारात्मक विचारातून वाटचाल करणार असून, स्वच्छ, सुंदर शहर. निटनेटके प्रशासन, खड्डेमुक्त शहर करण्याचा आमचा प्रय▪राहणार असून हे सर्वकेवळ नागरिकांच्या सहकार्यानेच शक्य होणार आहे. असे मत नूतन महापौर सुरेखा कदम यांनी व्यक्त केले. स्वकुळसाळी हितसंवर्धक मंडळाच्या वतीने सौ.कदम व उपमहापौर श्रीपाद छिंदम यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर लक्ष्मीकांत तरोटे, शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, दीपक सुळ, कृष्णा बागडे, नगरसेविका मालन ढोणे, संजय सांगावकर, सतीश झिकरे, जितेंद्र लांडगे, उमेश कोदे, शैला मानकर, छाया गवळी, सुरेखा शेकटकर, सुरेश इंगळे, सल्लागार प्रदीप वाव्हळ, मंडळाचे विश्वस्त, कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते
|









