जामखेड :शहारत चार डेंग्यू सदृश आजाराचे रुग्ण आढळल्याने शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. शहरामध्ये झालेल्या पावसामुळे सर्वत्र गटारी...
जामखेड :शहारत चार डेंग्यू सदृश आजाराचे रुग्ण आढळल्याने शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. शहरामध्ये झालेल्या पावसामुळे सर्वत्र गटारी तुंबल्या असून, जागोजागी कचर्याचे ढिगारे दिसत आहेत. सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे साथीचे आजार पसरू नयेत यासाठी प्रशासनाने तात्काळ उपायोजना करावी. या संदर्भात शिवप्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष पांडुरंग भोसले यांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, जामखेड शहरामध्ये गेल्या काही दिवसात मोठय़ा प्रमाणावर पाऊस झालेला आहे. त्यामुळे शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे साथीचे आजाराचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर वाढले आहे. शहरात डेंग्यू व इतर साथीचे आजार रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करून नाल्याची, उघड्यावर शौचलय साफसफाई स्वच्छता ,पाण्याचे साठे ,बी एच ,सी पावडर फवारणी ,धूर फवारणी , करण्यासंदर्भात तात्काळ कारवाई व्हावी. अशा मागणीचे निवेदन शिवप्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आले आहे. जामखेड शहरामध्ये नगरपरिषदेपुढे मुख्य प्रश्न स्वच्छतेचा असून , त्याकडे नगरपरिषदेने लक्ष देणो गरजेचे आहे. परंतु अशीच परिस्थिती राहिली तर जामखेडकरांचे आरोग्य धोक्यात येऊन अनेक आजारांना बळी पडावे लागेल. गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये कीटकनाशक किंवा पावडर फवारलेली दिसत नाही. या संदर्भात तहसीलदार यांना कळविले असून, त्यांनी तात्काळ उपाय योजना करण्याचे आदेश दिले आहेत. नगरपरिषदेला मुख्याधिकारी नसल्याने कर्मचार्यांमध्ये ताळमेळ दिसून येत नाही. शहरात अरुंद गटारी असल्याने गटारीचे पाणी एकजागी साचून राहत आहे. त्यामुळे अनेक आजारांना आमंत्रित दिल्याचे दिसत आहे. त्यामुळे आज जामखेड शहरामध्ये ४ डेंग्यू सदृश रुग्ण आढळल्याने आरोग्याचा मोठा गंभीर प्रश्न बनला आहे. असे निवेदनात म्हटले आहे . या निवेदनावर शिवप्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष पांडुरंग भोसले , युवराज खेत्रे, महादेव राऊत, युवराज जमदाडे, अभिराज चिंचकर, बालाजी खेत्रे, मंगेश राजगुरू, शहाजी जमदाडे ,अमित पवार, संतोष निमोणकर यांच्या साह्या आहेत. |
<< Back to Headlines Next >>
|
|
|
|
|
|
| Contact Us | | | About Us | | | Advertise with Us |
|
|
|
|