आमदार कर्डिले मंत्रिपदाच्या चर्चेत पाथर्डी -नगर-राहुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे नाव नव्याने लवकरच होणार्या...
आमदार कर्डिले मंत्रिपदाच्या चर्चेत
पाथर्डी -नगर-राहुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे नाव नव्याने लवकरच होणार्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आघाडीवर असण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. लवकरच मंत्रिमंडळात फेरबदल होवून खांदेपालट होणार असल्याचे संकेत मिळाल्याने, सत्ताधारी भाजपाचे ज्येष्ठ आमदार जे सलग पाचवेळा आमदार म्हणून विधानसभेत गेले आहेत. तसेच ज्यांना प्रशासन हाकण्याचा मोठा अनुभव आहे. संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये आ. कर्डिले यांचा राजकीय दबदबा असून, भाजपाला जिल्ह्यात पुढील निवडणुकांमध्ये अच्छे दिन आणायचे असतील तर आ. कर्डिले यांना लालदिवा देणे महत्वाचे ठरणार आहे. जिल्ह्यातील एक कणखर अनुभवी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. यापूर्वी त्यांनी राज्यमंत्री म्हणून पारदर्शक काम केलेले आहे. भाजपचे सध्याचे अनुभवी ज्येष्ठ आमदार म्हणून त्यांचेच नाव घ्यावे लागेल. लांडे खून प्रकरणातूनही त्यांची निर्दोष सुटका झाली आहे. त्यामुळे सध्याचे पालकमंत्री ना. राम शिंदे यांना कॅबिनेटमंत्री म्हणून बढती मिळाली तर आ. कर्डिले यांच्या रुपाने एक राज्यमंत्री म्हणून जिल्ह्याला दोन लालदिवे मिळतील. पंचवीस वर्षाचा राजकीय मोठा अनुभव असलेल्या आ. कर्डिले यांना मंत्रिपदाची संधी मिळाली तर भाजपाला याचा मोठा राजकीय फायदा करून घेता येईल
| . |










