भाई सथ्था नाईट हायस्कूलमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अहम दनगर : हिंद सेवा मंडळ संस्थेच्या भाई सथ्था नाईट हायस्कूलचा उच्च माध...
भाई सथ्था नाईट हायस्कूलमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
अहमदनगर : हिंद सेवा मंडळ संस्थेच्या भाई सथ्था नाईट हायस्कूलचा उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा ३७.८२ एवढा निकाल लागला. कला शाखेचा निकाल ३५.२९% तर वाणिज्य शाखेचा ५५.५५% एवढा निकाल लागला. परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कला शाखेत सविता मलकुनाईक (७२.४६%), कलावती गिर्हे (६९.८४%), हमीदा पठाण (६२.२३%), तर वाणिज्य शाखेत शशांक दिवेकर (८२.६१%), सागर आढाव (६१.६९), स्मिता गांधी (६0%) अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय आले. रात्रप्रशालेचे शाला समितीचे अध्यक्ष डॉ. पारस कोठारी यांचे हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. व्यावसायिक दिलीप पाटील, संस्थेचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, कार्याध्यक्ष ब्रिजलाल सारडा, मानद सचिव सुनील रामदासी, प्राचार्य सुनील सुसरे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
|










