फुले शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत अहमदनगर : श्री संत सावताश्रम शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले विद्या मंदिर व सावित्रीबाई फुले ...
फुले शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत
|
|
अहमदनगर :श्री संत सावताश्रम शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले विद्या मंदिर व सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाब, औक्षण, फुगे व मोफत पाठय़पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. संस्थेचे विश्वस्त सुरेश रासकर, शिक्षण समितीचे कार्याध्यक्ष विष्णू फुलसौंदर, मंडळाचे उपाध्यक्पंडितराव खरपुडे, मुख्याध्यापक राजेंद्र बनकर, सुनीता पालवे-काकडे आदी उपस्थित होते. शासनाच्या सर्वशिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या मोफत पाठय़पुस्तकांचा विद्यार्थ्यांनी चांगल्यापध्दतीने अभ्यास करुन जास्तीत जास्त गुण संपादन करुन शाळेचे नाव उज्वल करावे, असे रासकर यांनी सांगितले. फुलसौंदर म्हणाले, विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा, त्यांच्या कला-गुणांना वाव मिळावा यासाठी शाळेच्या माध्यमातून विविध प्रय▪केले जात आहेत. शासनाच्या विविध योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवून देण्याचाही प्रय▪ केला जातो, असे सांगितले. रावसाहेब काकडे यांनी प्रास्ताविक केले
|










