नेवासा पंचायतीवर महायुतीचाच झेंडा फडकणार-बेरड नेवासा: शहर विकास साधण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन नगरपंचायतीवर महायुतीचा झेंडा फडकवणारच, असा ...
नेवासा पंचायतीवर महायुतीचाच
झेंडा फडकणार-बेरडनेवासा: शहर विकास साधण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन नगरपंचायतीवर महायुतीचा झेंडा फडकवणारच, असा ठाम विश्वास भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी व्यक्त केला.
आ. बाळासाहेब मुरकुटेंच्या जनसंपर्क कार्यालयात दिलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा चिटणीस नितीन दिनकर, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, शहराध्यक्ष पोपट जिरे, मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष चंद्रकांत काळोखे, दिनेश कारंडे उपस्थित होते.प्रा. बेरड म्हणाले, भाजपाच्या सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली असून सरकारने शेतकरी हिताच्या अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यामध्ये महत्वाची पंतप्रधान कृषी पीक विमा योजना आहे.पूर्वीच्या याजनेचा प्रिमियम जास्त होता. आणि तांत्रिक अडचणी होत्या. त्याचा लाभ शेतकर्यांना न होता बँकेला होत होता. भाजप सरकारने सर्वात कमी प्रिमियम आणि लाभ, पेरणी, नांगरणी, काढणी पश्चात अशा सर्व स्थितीत पिकाची जबाबदारी घेतली आहे. या सर्व योजना कार्यकर्त्यांनी शेतकर्यांपर्यंत पोहोचवाव्यात. मुद्रा लोनसाठी येणार्या अडचणी दूर करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करून त्यामार्फत अडचणी सोडवण्यासाठी प्रय▪केला जाईल. आगामी नगरपंचायत निवडणुकीसाठी महायुती सर्वांनी एकत्र येवून शहर विकासासाठी एकत्र येवून शहराच्या नगरपंचायतीवर झेंडा फडकवू









