धार्मिक स्थळांबाबत शांततेने प्रश्न सोडवण्याचे आवाहन उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका हद्दीतील ५७४ धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण मन...
धार्मिक स्थळांबाबत शांततेने प्रश्न सोडवण्याचे आवाहन
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका हद्दीतील ५७४ धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण मनपाने केले. त्या यादीमध्ये ६३ मस्जीद व दर्गाचा समावेश करण्यात आला. या संदर्भात चर्चा करण्यासाठी शहरातील मस्जीद व दर्गाच्या ट्रस्टी, समाजसेवक, वकील, इंजिनिअर, जाणकार यांची बैठक नुकतीच सर्जेपुरा येथील रहेमत सुलतान हॉलमध्ये हाजी शौकतभाई तांबोळी यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
या बैठकीत मार्गदर्शन करताना तांबोळी म्हणाले, न्यायालयाचा आदेश असल्याने ज्या मस्जीद व दर्गांची नावे छापून आली त्यांच्या ट्रस्टींनी कागदपत्रांची जुळवाजुळव करावी. जागेचे टॅक्स, लाईट बील, जागेचे खरेदीखताचे कागदपत्र , किती वर्षापूर्वीची मस्जीत किंवा दर्गा , त्याकाळात कोण ट्रस्टी होते याची माहिती घेऊन कागदपत्रे व्यवस्थित जमा करावी किंवा कोणी जागा दान दिली असेल तर त्या माणसाकडून सर्व कागदपत्रे घेऊन नव्या ट्रस्टींनी ती स्वत:कडे घेऊन शासनास सहकार्य करावे व शांततेने प्रश्न सोडवावे असे सांगितले.










