मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी साळवे अकोले: अकोले शासकीय विश्रामगृहावर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा अकोले सभासदांच...
|
मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी साळवे
अकोले: अकोले शासकीय विश्रामगृहावर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा अकोले सभासदांची वार्षिक सभा राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत नविन तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्षपदी संघटनेचे निष्ठावंत संतोष साळवे यांची निवड सवार्नुमते करण्यात आली. त्यांच्या निडीची सुचना विद्याचंद्र सातपुते यांनी केली. त्यास अनुमोदन भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिले. यावेळी मावळते अध्यक्ष अनिल रहाणे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी तर सुर्यभान सहाणे यांची खजिनदार पदी निवड करण्यात आली.
नुतन अध्यक्ष संतोष साळवे यांनी तालुका कार्यकारिणीच्या निवडीची घोषणा केली. कार्याध्यक्ष भाऊसाहेब वाकचौरे, शहर अध्यक्ष अमोल शिर्के, उपाध्यक्ष जगन आहिरे, राम चोथवे, दादाभाऊ फापाळे, नितिन शहा, खजिनदार डॉ.शरद तळपाडे, सचिव विद्याचंद सातपुते, संपर्क प्रमुख प्रा.सुनिल मोहटे, सहसचिव अशोक उघडे, हरीभाऊ आवारी, प्रसिद्धी प्रमुख सचिन लगड तसेच वृत्तवाहीनी तालुकाध्यक्ष पदी बाळा पवार , उपाध्यक्ष सचिन खरात, सचिव गणेश आवारी , भाऊसाहेब साळवे, सांस्कृतीक विभाग प्रमुख मच्छिंद्र देशमुख , सदस्य पदी दत्ता रत्नपारखी, दत्ता जाधव, संदिप आरोटे, युवराज हंगेकर, सुनिल आरोटे, अशोक शेळके, स्वप्नील शहा, शिवनाथ भोजणे, शिवा धुमाळ, दत्ता शेणकर, रामकृष्ण कानवडे यांची निवड जाहीर करण्यात आली . या निवडीचे स्वागत संघाचे संस्थापक संजय भोकरे, राज्य अध्यक्ष गोविंद घोळवे, जिल्हाध्यक्ष नानासाहेब जवरे, सचिव नवनाथ कुथाळ यांनी अभिनंदन केले आहे
|










