निमगाव वाघा येथे कृषिदूतांचे आगमन अहमदनगर/ तालुक्यातील निमगाव वाघा येथे शेती अभ्यासाचे उपक्रम राबविणार्या कृषिदूतांचे नुकतेच आगमन झा...
कृषिदूतांचे आगमन
अहमदनगर/
तालुक्यातील निमगाव वाघा येथे शेती अभ्यासाचे उपक्रम राबविणार्या कृषिदूतांचे नुकतेच आगमन झाले आहे. त्यांचे निमगाव वाघा ग्रामस्थांच्या वतीने मोठय़ा उत्साहात स्वागत करण्यात आले. या वेळी सरपंच सौ.विद्या दत्तात्रय डोंगरे, ग्रामसेविका अंज़ूम जुबेर शेख, ग्रामपंचायत सदस्य अरुण फलके, जालिंदर आतकर, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन भिमराज कापसे, व्हा.चेअरमन पै.नाना डोंगरे, भाऊ कदम, व्ही.एच.सोनवणे, स्वप्निल काळे, पै.विकास निकम, वैभव पवार, भरत फलके, अंकुश आतकर, बाळासाहेब बोडगे आदींसह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालय, विळद घाट, या कृषी महाविद्यालयातील कृषिदूतांच्या वतीने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम निमगाव वाघा या ठिकाणी विविध शेतीविषयक उपक्रम पुढील चार महिने राबविले जाणार आहेत. त्यामध्ये कृषी प्रात्यक्षिके, गटचर्चा, व्याख्याने, जनावरांचे लसीकरण, चिकित्सा, आरोग्य, रक्तदान, क्रीडा स्पर्धा, वृक्षारोपण, महिला मेळावे, कृषीदिन, शेतकरी मेळावा व माती परिक्षण आदी उपक्रम या राबविले जाणार आहेत. कृषिदूत म्हणून मनोज कर्जुले, प्रतीक पोवार, अभिज़ित पवार, रमेश माळवे, विकास सोनवणे आदी काम पाहणार आहेत. |









