शहर विकासासाठी एकत्र - आ. संग्राम जगताप शहर विकासाचा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून कॉग्रेस-राष्ट्रवादी व अपक्ष आघाडीने कोणत्याही पदाची अपेक्...
शहर विकासासाठी एकत्र - आ. संग्राम जगताप
शहर विकासाचा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून कॉग्रेस-राष्ट्रवादी व अपक्ष आघाडीने कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता भारतीय जनता पक्षासोबत आघाडीचा निर्णय घेतला आहे. स्थानिक पातळीवर नगरसेवकांच्या इच्छेनूसार ही आघाडी स्थापन करण्यात आल्याचे श्री. जगताप यांनी सांगितले.
पुणे मनपात राजकीय इतिहास घडला होता. एकमेंकांना पाण्यात पाहणारे भाजप व राष्ट्रवादीने एकत्र येवून सत्ता मिळविली होती. या घटनेमुळे पुणे पॅटर्न पुढे आला. याच पार्श्वभूमीवर नगरच्या मनपातही नविन पॅटर्न निर्माण झाला आहे. कॉग्रेस, राष्ट्रवादी व भाजपचे खा. दिलीप गांधी यांचा गट एकत्र आला आहे. हा पॅटर्न राज्यभर गाजण्याची शक्यता आहे.
शिवसेना-भाजप युती टिकणार की तुटणार हा सर्वांच्या उत्तुकतेचा विषय होता. अखेर या विषयाबाबतची उत्सुकता तेव्हा संपली जेव्हा मनपात काल सकाळी भाजपच्या एका गटाने राष्ट्रवादी, कॉग्रेस व अपक्ष आघाडीसह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपचे खा. दिलीप गांधी यांचे सर्मथक मानले जाणारे मनेष साठे यांच्या पत्नी नंदा मनेष साठे यांनी महापौर पदासाठी तर खा. गांधी गटाचेच श्रीपाद छिंदम यांनी उपमहापौर पदासाठी आपले उमेदवारी अर्ज काल दुपारी १२.३0 वा. दाखल केले. भाजपच्या एकूण ९ नगरसेवकांपैकी नंदा साठे, श्रीपाद छिंदम, मालनताई ढोणे व सुवेंद्र गांधी यांचा या आघाडीत समावेश आहे. तर भाजपच्या उर्वरित पाच नगरसेवकांनी सेनेसोबत राहणे पसंत केले असल्याचे बोलले जाते.
उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी राष्ट्रवादीचे आ. अरूण जगताप, आ. संग्राम जगताप, माजी आ. दादा कळमकर, महापौर अभिषेक कळमकर, अविनाश घुले, संपत बारस्कर, कुमार वाकळे, स्वप्निल शिंदे, आरिफ शेख, भाजपचे गौतम दिक्षीत, मनेष साठे, सुवेंद्र गांधी, कॉग्रेसचे निखील वारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शहर विकास आघाडी स्थापन करण्यात आल्याची घोषणा सर्व पदाधिकार्यांकडून करण्यात आली.
राजकीय घडामोडीनंतरचे बलाबल
भाजप (आगरकर गट)- सेना युती भाजप ५, सेना २० (किशोर डागवालेंसह) उषा ठाणगे, नंदा कुलकर्णी, सारीका भूतकर - ३ अपक्ष विणा बोज्जा, सुवर्णा जाधव (दोन्ही मनसे) : एकूण- ३०भाजप-राष्ट्रवादी-कॉँग्रेस शहर विकास आघाडी भाजप ४, राष्ट्रवादी शहर विकास आघाडी २१, कॉँग्रेस ११, अपक्ष स्वप्नील शिंदे, मनसेचे गणेश भोसले असे ३८(सेनेने कॉँग्रेसचे तीन व राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकांना सहलीवर रवाना केले आहे. ) नव्या आघाडीचे : एकूण ३२